.
मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विधीमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानपरिषदेचे गटनेते आणि प्रतोद हे पद रिक्त असून या पदावर एकनाथ शिंदे यांची राष्ट्रवादीचे गटनेते आणि अनिकेत तटकरे यांची पक्ष प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली अशी माहिती देण्यात आली. ही माहिती अजूनही अधिकृत संकेतस्थळावर दाखवण्यात येत आहे ही गंभीर चूक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पॉईंट ऑफ प्रोसीजरनुसार सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.
विधानपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते आमदार एकनाथ खडसे असावे यासंदर्भात पक्षाच्यावतीने सभापतींना पत्र देण्यात आले आहे याबाबतचे पत्र सभागृहात दाखवले. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देशाचे पंतप्रधानाच बदलले आहेत. त्यामुळे माझ्याकडे असलेले पक्षाचे गटनेता पदही धोक्यात आले आहे असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला. नागालँडमध्ये रीओ हे सर्व पक्षाचा पाठिंबा घेतात, आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नवी पद्धत राज्यात सुरु केली आहे का? ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधीमंडळ पक्षाचे गटनेते होऊ इच्छित आहेत असे वाटते असा मिश्किल टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.
https://www.facebook.com/watch/?v=725996512392308
Maharashtra Assembly Eknath Shinde Eknath Khadse Jayant Patil