बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

कोरोना लसीकरणाबाबत विधिमंडळात झाला हा ठराव

by India Darpan
जुलै 6, 2021 | 1:48 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
संग्रहित फोटो

संग्रहित फोटो


विशेष प्रतिनिधी, मुंबई
राज्यातील कोविड संसर्गाला आळा घालण्यासाठी  व तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी करण्यासाठी महाराष्ट्राला केंद्र सरकारने प्रति महिना किमान ३ कोटी लसीचे डोस उपलब्ध करून द्यावेत, असा ठराव आज विधानपरिषद व विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आला. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी हा ठराव मांडला.
श्री. टोपे यांनी मांडलेल्या या ठरावात म्हटले आहे की, राज्यात अद्याप कोविड संसर्गाची स्थिती आहे. त्यातच नव्याने डेल्टा प्लस रुग्ण व म्युकरमायसिसचे रुग्ण आढळून आले आहेत. या सर्वाला आळा घालण्यासाठी व संभाव्य तिसरी लाटेची तीव्रता कमी करण्यासाठी लसीकरण हा एकमेव उपाय आहे. मोठ्या प्रमाणावरील लसीकरणामुळे सामूहिक प्रतिकार शक्ती निर्माण होईल. दिनांक २६ जून २०२१ रोजी राज्यामध्ये एका दिवसात ७,३८,७०४ लोकांचे लसीकरण केले असून दिनांक ३ जुलै २०२१ रोजी एका दिवसात ८ लाखांपेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण केले आहे.
महाराष्ट्र राज्याची दैनिक लसीकरणाची क्षमता ही १० ते १५ लाखाच्या दरम्यान असल्याने केंद्र शासनाने प्रत्येक महिन्यास किमान ३ कोटी लसीचे डोस राज्यास उपलब्ध करून दिल्यास राज्याचे लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करता येईल. यासंदर्भात राज्यातील सर्व पक्षांच्या लोकप्रतिनिधींचेही लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबतची मागणी आहे. हे लसीकरण लवकर पूर्ण झाल्यास जनतेमधील सामूहिक प्रतिकार शक्ती (Herd Immunity) मोठ्या प्रमाणात विकसित होईल व या आजाराची तीव्रताही कमी होईल. तसेच आरोग्य यंत्रणेवरचा ताण कमी होईल. तसेच स्तर-३ चे निर्बंध कमी करता येतील. राज्यातील व्यवहार पूर्ववत सुरू करणे शक्य होईल. परिणामी अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.
कोविड-१९ महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावावर प्रतिबंधात्मक उपाययोजना अंतर्गत राज्यातील लोकसंख्येचे लसीकरण केंद्र शासनाच्या धोरणानुसार करण्यात येत आहे. राष्ट्रव्यापी कोविड- १९ प्रतिबंधात्मक लसीकरण धोरणाची अंमलबजावणी १६ जानेवारी राज्यात सुरू करण्यात आली.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रथम टप्प्यात आरोग्य सेवा देणारे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी (Health Care Workers) आणि कोविड-१९ साथरोग प्रतिबंधात्मक कार्यक्रम अंमलबजावणीसाठी नियुक्त कर्मचारी (Front line workers) यांचे लसीकरण सुरू करण्यात आले. द्वितीय टप्पा दिनांक १ मार्च पासून सुरू करण्यात आला. यात ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण व ४५ वर्ष वयोगटावरील सहव्याधीग्रस्त नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.
१ एप्रिल पासून ४५ वर्ष वयोगटावरील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे १ मे पासून वय वर्षे १८ ते ४४ वयोगटातील जवळपास ५.७१ कोटी लाभार्थ्यांचे कोविड१९ लसीकरण करण्याबाबत केंद्र शासनाने घोषणा केली होती. १ मे पासून खुल्या दराचे राष्ट्रीय कोविड १९ वेगात्मक लसीकरण (Liberalized Pricing Accelarated & National Covid-19 Vaccination) धोरण लागू झाले आहे. तसेच केंद्र शासनाच्या वेळोवेळीच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे राज्यातील कोविड १९ लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे.
वयोवृद्ध आणि दिव्यांग नागरिकांसाठी केंद्र शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार त्यांच्या घराजवळ कोविड लसीकरण केंद्र घेतले जातात. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार निवडलेल्या खाजगी रुग्णालयांत आणि औद्योगिक आस्थापनेच्या ठिकाणी कोविड लसीकरण केंद्र घेतले जातात. २१ जून रोजीच्या केंद्र शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार देशांतर्गत लस निर्मात्याकडून मासिक लस उत्पादित केलेल्या एकूण उत्पादनापैकी ७५% लस केंद्र शासनाकडून खरेदी करून राज्याला पुरविली जात आहे. उर्वरीत २५% लस खाजगी रुग्णालयाला खरेदी करता येईल असा निर्णय झाला आहे. तसेच १८ ते ४४ वयोगटातील सर्व नागरिकांना लस पुरविण्याची जबाबदारी केंद्र शासनाने घेतल्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे.
राज्यात ५ जुलै पर्यंत केंद्र शासनाकडून लसीचे २,८४,३९,०६० डोसेसचा पुरवठा झाला आहे. तर राज्य शासनाने २५, १०,७३० लसींचे डोसेस खरेदी केले आहेत. ५ जुलै पर्यंत राज्यात एकूण ३,४३,८२,५८३ लाभार्थ्यांना लसीकरण झाले आहे. यामध्ये खाजगी रुग्णालयांनी प्राप्त केलेल्या लसींचाही समावेश आहे. महाराष्ट्र राज्य हे देशात लसीकरणामध्ये अव्वल स्थानावर असून त्यानंतर लोकसंख्येने सर्वाधिक असणारे उत्तर प्रदेश ३.२६ कोटी लसीकरणासह दुसऱ्या स्थानावर आहे. त्यानंतर लसीकरण झालेल्या राज्यांचा क्रम पुढीलप्रमाणे आहे. (३) गुजरात २.६८ कोटी, (४) राजस्थान २.५८ कोटी, (५) कर्नाटक २.३८ कोटी (६) पश्चिम बंगाल २.२७ कोटी, (७) मध्य प्रदेश २.१६ कोटी याशिवाय इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात वाया जाणाऱ्या लसींचे प्रमाण हे देखील अत्यंत कमी व नगण्य आहे, असेही श्री. टोपे यांनी सांगितले.
श्री. टोपे म्हणाले की, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या एकूण ४,२५,४२,९४३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६०,९८,१७७ (१४.३३%) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यामध्ये आज अखेर एकूण १,२३,०३० एवढे मृत्यू झालेले आहेत. तसेच राज्यात आज रोजी एकूण १.२३.२२५ अॅक्टिव्ह रुग्ण असून हे देशात सर्वात जास्त आहेत.
डेल्टा प्लस या व्हेरियन्टचे एकूण २१ रुग्ण राज्यात आढळले असून ते अनुक्रमे रत्नागिरी-९, जळगाव-७, मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग व रायगड (प्रत्येकी १) असे जिल्हानिहाय रुग्ण आढळले आहेत. राज्याने कोविड-१९ च्या आजारावर मात करण्यासाठी टेस्टिंग (Testing), ट्रेसिंग (Tracing), उपचार (Treatment) या त्रिसूत्रीचा अवलंब केलेला आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक अपडेट – शहर व जिल्ह्यात आज एवढे आढळले कोरोना रुग्ण

Next Post

गणेश मूर्तींच्या उंचीची मर्यादा रद्द करा; भाजपाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

India Darpan

Next Post

गणेश मूर्तींच्या उंचीची मर्यादा रद्द करा; भाजपाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011