मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात सत्ता स्थापन झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाने आगामी काळासाठी आता आणखी एक एक पावले पुढे चाकण्यास प्रारंभ केला आहे. मंत्रिमंडळात चंद्रकांत पाटील यांचा समावेश केल्यानंतर आता भाजप प्रदेशाध्यांची घोषणा करण्यात आली आहे. दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी यासंदर्भातील निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार, महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, मुंबई शहराध्यक्षपदी आशिष शेलार यांना संधी देण्यात आली आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन या नेमणुका करण्यात आल्या आहेत. शेलार यांचा मुंबईत चांगलेच वजन आहे. तसेच मुंबई महापालिका निवडणुकीत त्यांचे कौशल्य वापरण्यासाठीच त्यांच्याकडे नेतृत्व देण्यात आले आहे. तर, बावनकुळे हे इतर मागासवर्गीय (ओबीसी) समाजाचे नेतृत्व करतात. त्यामुळे आता त्यांना प्रदेशाध्यक्षपदाची संधी देण्यात आली आहे. पक्ष संघटन मजबूत करणे आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबरोबरच २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रभावी काम करण्यासाठी दोघांना ही संधी देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
https://twitter.com/cbawankule/status/1558031044405649408?s=20&t=BcKN2U_U1slBT29q3YaEDg
Maharashtra and Mumbai BJP President Announcement
Chandrasekhar Bawankule Ashish Shelar)