मुंबई – राज्य सरकारने पाच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश शुक्रवारी काढले आहेत. त्यात खालील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
२००८च्या बॅचचे आयएएस अधिकारी आर एस जगताप यांची राज्य सामायिक प्रवेश परिक्षेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. २०१०च्या बॅचचे आयएएस अधिकारी के एस पगारे हे मुंबईतील फिल्मसिटीचे व्यवस्थापकीय संचालक होते. त्यांच्याकडे आता रेशनिंगचे नियंत्रक आणि नागरी पुरवठ्याचे संचालकपद देण्यात आले आहे. २०११च्या बॅचचे आयएएस अधिकारी कान्हुराज बगाटे यांना रेशनिंग नियंत्रक आणि नागरी पुरवठ्याचे संचालक करण्यात आले आहे. २०१२च्या बॅचचे आयएएस अधिकारी सी डी जोशी हे राज्य सामायिक प्रवेश परिक्षेचे आयुक्त होते. त्यांच्याकडे आता भूजल सर्वेक्षण विभागाचे संचालकपद देण्यात आले आहे. २०१५च्या बॅचच्या आयएएस अधिकारी श्रीमती भुवनेश्वरी एस यांच्याकडे नागपूर स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार होता. त्यांची बदली आता नागपूरच्या वनमतीचे महासंचालक म्हणून करण्यात आली आहे.