मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य सरकारने सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. त्यानुसार एकूण ४४ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्यातील सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारने नवरात्रोत्सवातच हे आदेश काढून संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने नव्या ठिकाणी पदभार घेण्याचे आदेशित केले आहे. बघा, बदल्यांची संपूर्ण यादी
अधिकाऱ्याचे नाव आणि कंसात नव्याने झालेल्या नियुक्तीचे ठिकाण
१) श्रीमती लीना बनसोड (अतिरिक्त आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे)
२) विवेक जॉन्सन (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, चंद्रपूर)
३) डॉ. रामास्वामी एन. (आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार आणि उद्यम, नवी मुंबई)
४) अभिजीत राऊत (जिल्हाधिकारी, नांदेड)
५) डॉ. हर्षदीप श्रीराम कांबळे (प्रधान सचिव, उद्योग विभाग)
६) श्रीमती.जयश्री एस. भोज (डीजीआयपीआर आणि एमडी, महा आयटी कॉर्पोरेशनचा अतिरिक्त कार्यभार)
७) परिमल सिंग (प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, मुंबई.)
८) राजेश नार्वेकर (महापालिका आयुक्त नवी-मुंबई महानगरपालिका)
९) ए.आर.काळे (आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, मुंबई)
१०) अभिजीत बांगर (ठाणे महापालिका आयुक्त)
११) डॉ.विपिन शर्मा (मुख्य कार्यकारी अधिकारी, एमआयडीसी, मुंबई)
१२) नीलेश रमेश गटणे, (मुख्य कार्यकारी अधिकारी,एसआरए, पुणे.)
१३) सौरभ विजय (सचिव, सांस्कृतिक आणि पर्यटन विभाग)
१४) मिलिंद बोरीकर (मुख्य अधिकारी, मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळ)
१५) अविनाश ढाकणे (मॅनेजिंग डायरेक्टर, दादासाहेब फाळके फिल्मनगरी)
१६) संजय खंदारे (प्रधान सचिव -१ सार्वजनिक आरोग्य विभाग)
१७) डॉ. अनबलगन पी.(अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विद्युत निर्मिती कंपनी)
१८) दीपक कपूर, (अतिरिक्त मुख्य सचिव, जलसंपदा विभाग)
१९) श्रीमती. वल्सा नायर (प्रधान सचिव, गृहनिर्माण)
२०) श्रीमती मनीषा पाटणकर-म्हैसकर (प्रधान सचिव आणि मुख्य प्रोटोकॉल अधिकारी, मंत्रालय, मुंबई आणि अतिरिक्त कार्यभार मराठी भाषा विभाग)
२१) मिलिंद म्हैसकर (प्रधान सचिव, नागरी विमान वाहतूक, सामान्य प्रशासन विभाग, मुंबई आणि अतिरिक्त प्रभार प्रधान सचिव राज्य उत्पादन शुल्क)
२२) प्रवीण चिंधू दराडे ( सचिव, पर्यावरण विभाग)
२३) तुकाराम मुंढे (आयुक्त एफडब्लू आणि संचालक, एनएचएम, मुंबई)
२४) अनुप कुमार यादव, (सचिव, अल्पसंख्याक विकास विभाग)
२५) डॉ. प्रदीप कुमार व्यास (अतिरिक्त मुख्य सचिव, आदिवासी विकास विभाग)
२६) डॉ. अश्विनी जोशी (सचिव, वैद्यकीय शिक्षण)
२७) दीपेंद्र सिंह कुशवाह (विकास आयुक्त,उद्योग)
२८) अशोक शिनगारे (जिल्हाधिकारी, ठाणे)
२९) श्रीमती श्रद्धा जोशी (महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे एमडी)
३०) मनुज जिंदाल (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, ठाणे)
३१) सचिन ओंबासे (जिल्हाधिकारी, उस्मानाबाद)
३२) अमन मित्तल (जिल्हाधिकारी, जळगाव)
३३) राजेश पाटील (संचालक, सैनिक कल्याण, पुणे.)
३४) श्रीमती आशिमा मित्तल (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक)
३५) कीर्ती किरण एच पुजार (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी)
३६) रोहन घुगे (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद वर्धा)
३७) विकास मीना (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, औरंगाबाद)
३८) श्रीमती वर्षा मीना (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जालना)
३९) के.व्ही.जाधव (संयुक्त व्यवस्थापकीय संचालक, एमएसआरडीसी, मुंबई)
४०) कौस्तुभ दिवेगावकर, (प्रकल्प संचालक, बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण विकास प्रकल्प, पुणे)
४१) एम.देवेंद्र सिंग (जिल्हाधिकारी, रत्नागिरी)
४२) विवेक एल. भीमनवार (परिवहन आयुक्त)
४३) राजेंद्र निंबाळकर (व्यवस्थापकीय संचालक एमएसएसआयडीसी)
४४) डॉ. भगवंतराव नामदेव पाटील (महापालिका आयुक्त, नांदेड वाघाळा महानगरपालिका)
Maharashtra 44 IAS Officers Transfer Government Order