गुरूवार, सप्टेंबर 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

महाराष्ट्राला भेटणार दुसरी वंदे भारत एक्सप्रेस; या मार्गावर धावणार, पंतप्रधान मोदी करणार उदघाटन

by Gautam Sancheti
डिसेंबर 5, 2022 | 4:59 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
Vande Bharat Train

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – देशातील सर्वाधिक गती आणि आलिशान असलेली वंदे भारत एक्सप्रेस आणखी एका नव्या मार्गावर धावणार आहे. सध्या मुंबई-अहमदाबाद या मार्गावर ती धावत आहे. त्यानंतर आता महाराष्ट्राला दुसरी वंदे भारत एक्सप्रेस मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ११ डिसेंबर रोजी नागपूर दौऱ्यावर येत आहेत. यादिवशी ते बिलासपूर (छत्तीसगड) ते नागपूर (महाराष्ट्र) या मार्गावर चालणाऱ्या देशातील सहाव्या सेमी हायस्पीड वंदे भारत ट्रेनचे उद्घाटन करतील.

आठवड्यातून ६ दिवस सेवा
अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, ही ट्रेन आठवड्यातून सहा दिवस धावेल. सुमारे साडेपाच तासात प्रवासाचा एका टप्प्यातच पूर्ण करेल. बिलासपूर-नागपूर वंदे भारत ट्रेनचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी (११ डिसेंबर) नागपुरात होणार आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.
ही ट्रेन बिलासपूर येथून सकाळी ६.४५ वाजता सुटेल आणि सुमारे १२.१५ वाजता नागपूरला पोहोचेल. त्याचप्रमाणे ही गाडी नागपूरहून दुपारी २ वाजता सुटेल आणि ७.३५ वाजता बिलासपूरला पोहोचेल. सध्या सुपरफास्ट गाड्यांना नागपूरला पोहोचण्यासाठी सुमारे सात तास लागतात, मात्र ही ट्रेन सुमारे साडेपाच तासांत अंतर कापते.

हे थांबे असतील
या प्रकरणाशी परिचित असलेल्या दुसऱ्या अधिकाऱ्याच्या मते, ही ट्रेन दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR) द्वारे चालवली जाईल आणि तिचे रायपूर, दुर्ग आणि गोंदिया येथे नियोजित थांबे असतील. २०२३ मध्ये सिकंदराबाद आणि विजयवाडा दरम्यान आणखी एक वंदे भारत ट्रेन सुरू होण्याची शक्यता असल्याचेही अधिकाऱ्याने सांगितले.

दक्षिण मध्य रेल्वे (SCR) मधील ही स्वदेशी बनावटीची पहिली अर्ध-हाय-स्पीड रेल्वे असेल आणि दक्षिण भारतातील अशी दुसरी ट्रेन असेल, असे अधिकाऱ्याने पुढे सांगितले. या वर्षी ऑक्टोबरमध्ये मुंबई-अहमदाबाद मार्गावर नव्या पिढीतील वंदे भारत ट्रेनचे उद्घाटन करण्यात आले होते. पुढील वर्षी ऑगस्टपर्यंत ७५ वंदे भारत गाड्यांचे उद्घाटन करण्याचे रेल्वेचे उद्दिष्ट आहे.

अशी आहेत वैशिष्ट्ये
सेमी-हाय-स्पीड ट्रेनचे सर्व डबे स्वयंचलित दरवाजे, GPS-आधारित ऑडिओ-व्हिज्युअल प्रवासी माहिती प्रणाली, मनोरंजनाच्या उद्देशाने ऑनबोर्ड हॉटस्पॉट वाय-फाय आणि आरामदायी आसनांनी सुसज्ज आहेत. पहिली वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन १५ फेब्रुवारी २०१९ रोजी नवी दिल्ली-कानपूर-अलाहाबाद-वाराणसी मार्गावर रवाना झाली होती.

Maharashtra 2nd Vande Bharat Train on This Rout
PM Narendra Modi Nagpur to Bilaspur Chhattisgarh

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मालेगाव तालुक्यातील आंदोलन पेटले; मुंबई-आग्रा महामार्गांवर आंदोलकांचा रास्ता रोको, ही आहे मागणी

Next Post

धक्कादायक…खर्चासाठी पैसै दिले नाही म्हणून आजी – आजोबाची नातवाने केली हत्या

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

G1F4t faQAAKs27 e1758160633125
संमिश्र वार्ता

इतिहास संशोधक, शिवचरित्रकार गजानन मेहेंदळे यांचे निधन

सप्टेंबर 18, 2025
Untitled 24
महत्त्वाच्या बातम्या

स्व. मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना करणारा गजाआड…आरोपीचा धक्कादायक खुलासा

सप्टेंबर 18, 2025
G1EjK5lXIAA7N0k e1758158586845
महत्त्वाच्या बातम्या

टीम इंडिया विरुध्द पाकिस्तानचा पुन्हा सामना….यूएई विरुध्द सामना जिंकल्यामुळे सुपर फोरमध्ये लढत

सप्टेंबर 18, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींना व्यावसायिक प्रगती साधता येईल, जाणून घ्या, गुरुवार, १८ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 18, 2025
GwyqMwabYAA1fOl e1757399728553
महत्त्वाच्या बातम्या

पाकिस्तान क्रिकेट संघाने थेट आशिया कपमधून बाहेर पडण्याचा घेतला निर्णय

सप्टेंबर 17, 2025
Untitled 23
स्थानिक बातम्या

नाशिकमध्ये महाराष्ट्र चेंबरतर्फे शनिवारी शासकीय योजना आणि व्यवसायाच्या संधी विषयावर सेमिनार…

सप्टेंबर 17, 2025
mukt
संमिश्र वार्ता

महाज्ञानदीप’ पोर्टलवर भारतीय ज्ञान प्रणालीवर आधारित पहिला ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू

सप्टेंबर 17, 2025
crime 88
क्राईम डायरी

दुमजली माडीचे कौले काढून चोरट्यांनी घरातील रोकड व सोन्याच्या दागिण्यांवर मारला डल्ला

सप्टेंबर 17, 2025
Next Post
20221205 170036

धक्कादायक...खर्चासाठी पैसै दिले नाही म्हणून आजी - आजोबाची नातवाने केली हत्या

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011