नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अखिल भारतीय महानुभाव संमेलनात भगवान श्री चक्रधर स्वामी अष्टजन्मा शताब्दी जन्मोत्सवानिमित्त अखिल भारतीय महानुभव संमेलना विविध धार्मिक विषयावरील काव्य संमेलन रंगले. यावेळी विविध कवींनी आपल्या धार्मिक, सामाजिक आणि अध्यात्मिक विषयावरील कविता सादर केल्या.
या कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी आचार्य प्रवर नागराज बाबाजी तथा तपस्विनी आत्याबाईजी उपस्थित होत्या. सूत्रसंचालन मोहन दादा बाभूळगावकर व संदीप साप्ते यांनी केले. तसेच त्यांनी कविता देखील सादर केल्या. त्याचप्रमाणे या काव्य संमेलन आशाताई पुसदेकर, जीवन कवी भोजने, पूनम पुजारी, भारत भूषण जामोदेकर, गिरीश शास्त्री, द.ली. गामणे, अनिता सुरेश बोडके, सुरेश बेलूकर, लीलाधर गावले, ऋतुजा भोजने, समृद्धी आंबेकर, पूजा साळी, पूजा थेटे, गीता शिवरे, वर्षाताई शेवलीकर, भाग्यश्री बिडकर, सुमनताई जामोदेकर, महंत मुकुंदराज बाबा शास्त्री नागपूरकर, वसंत कपाटे, प्रा. दिवाकर दादाजी शास्त्री, रोहिणीताई शास्त्री कपाटे, सुनील दादा मेहेकरकर आदींनी आपापल्या कविता सादर केल्या. हे सर्व कवी महाराष्ट्रातील विविध भागातून आलेले होते नाशिक, घोटी, नाशिक रोड, बदनापूर, श्रीरामपूर, ठाणे, औरंगाबाद (संभाजीनगर) नागपूर, अकोला, बुलढाणा येथील या मान्यवर कवींनी यात सहभाग घेतला.