नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भगवान श्री चक्रधर स्वामी अष्टशताब्दी जन्मोत्सवानिमित्त आयोजित तीन दिवसीय अखिल भारतीय महानुभाव संमेलनात आजच्या दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात धर्मसभेचे आयोजन करण्यात आले होते. अनेक संत, महंत आणि महानुभाव पंथाच्या धर्मग्रंथ आणि तत्त्वज्ञानाचा अभ्यास करणाऱ्यांनी आपले विचार मांडले.
आजच्या काळात सामाजिक क्षेत्रात काहीसे निराशेचे आणि गढूळ वातावरण दिसत असताना यावेळी महानुभाव पंथाच्या तत्त्वज्ञानाची आणि विचाराची अत्यंत गरज आहे. तसेच महानुभाव पंथातील सामाजिक कार्याची भूमिका देखील महत्त्वाची ठरणारी आहे, असे प्रतिपादन महानुभाव पंथाचे अभ्यासक प्रा.डॉ. रमेश अवलगावकर ( पुणे ) यांनी केले. यावेळी त्यांनी पंथातील तत्त्वज्ञान सामाजिक धार्मिक कार्य या संदर्भातील विचार आणि भूमिका स्पष्ट केली.
यावेळी धर्मसभेच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष श्यामसुंदर विध्दांस बाबा (फलटण )हे उपस्थित होते. तर व्यासपीठावर महंत कारंजेकर बाबा, महंत खामनिकर बाबा, महंत यक्षदेव बाबा, महंत दर्यापूरकर बाबा, महंत भास्कर बाबा, महंत साळकर बाबा, तपस्विनी आलेगावकर अक्का, तपस्विनी मीराताई, महंत सातारकर बाबा, महंत राहेरगाव बाबा, आदींसह संत, महंत उपस्थित होते.
प्रा. डॉ. रमेश आवलगावकर म्हणाले की, श्री चक्रधर स्वामींच्या काळात सामाजिक स्थिती अत्यंत दयनीय होती, त्यावेळी सर्व मानवाचे कल्याण होईल, यासाठी चक्रधर स्वामींनी समतेचा विचार मांडला. त्यावेळी चार्तुवर्णी व्यवस्था, जातीभेद, स्त्री पुरुष भेद, अशा गोष्टींमुळे समाज विस्कळीत झाला होता, समाजाला एक दिशा देण्याचे कार्य श्री चक्रधर स्वामींनी दिले. तसेच त्यांचे गुरु श्री गोविंद प्रभू यांनी केले आणि आपल्या कार्यातून सामाजिक समतेचा संदेश दिला, असेही त्यांनी सांगितले.
प्रा.आवलगावकर म्हणाले की, मराठी भाषेच्या उदय, विकास आणि संवर्धनात महानुभाव पंथाची भूमिका मोलाची आहे. पंथातील विविध ग्रंथांच्या मराठी भाषेच्या योगदानातील कार्याचा आढावा घेतला तसेच या अनमोल ग्रंथांचा नव्या पिढीने अभ्यास करावा, असेही ते म्हणाले यावेळी महंत हंसराज दादा खामणीकर, महंत सोनपेठकर बाबा, महंत राहेरकर बाबा ( तरडगाव ), महंत गोपीराज शास्त्री आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिनकर अण्णा पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन महंत चिरडे बाबा यांनी केले. यावेळी देशभरातील तसेच राज्यातील व जिल्ह्यातील संत महंत व्यासपीठावर उपस्थित होते.
मंगळवार दि. ३० ऑगस्ट रोजी पहाटे ५ भगवान श्री चक्रधर स्वामींच्या चरणांकित स्थानास मंगल स्नान, वस्त्र समर्पण, विडा अवसर, श्रीमद् भगवद्गीता पाठ पारायण, आदी धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. त्यानंतर महानुभाव पंथातील अनेक संत महंत यांचा भेटकाळ विधी संपन्न झाला. दरम्यान, दुपारी बारा वाजता आरती तसेच श्री स्वामींच्या नावाचा तसेच पंचकृष्ण अवताराचा जयघोष करण्यात आला. तसेच देवास विडा अवसर वाहून पंच अवतार उपहार दाखविण्यात आला. तसेच महाराष्ट्रातील विविध ठिकाणांमुळे आलेली महानुभाव पंथाची विशेष देवपूजा वंदन करण्यासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या.
यावेळी व्यासपीठावर अखिल भारतीय महानुभाव संमेलनाचे मार्गदर्शक – प. म. श्री. सुकेणेकर बाबा , प. म. श्री. चिरडे बाबा, म. श्री. कृष्णराज बाबा मराठे तसेच आयोजक व स्वागतोत्सुक – मा. आमदार बाळासाहेब सानप, दिनकर अण्णा पाटील, दत्ता नाना गायकवाड, प्रकाश शेठ घुगे ( सचिव ), प्रकाश शेठ ननावरे (खजिनदार ), प्रभाकर आप्पा भोजने, अरुण महानुभव, विश्वास का. नागरे, छबू नागरे आदी उपस्थित होते. सर्व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते संत महानतांचे पुष्पहार घालून स्वागत व सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास स्वागत समिती लक्ष्मणराव जायभावे, भास्करराव गावित, उदयभाऊ सांगळे, सिताराम पाटील आंधळे, अरुण सोनूपंत भोजने, राजेंद्र जायभावे. संजय सोनुपंत भोजने, भास्करराव सोनवणे, सागर शांतीलाल जैन, योगेश मस्के, नंदू हांडे, किरण वसंत मते, सुरेश भाऊ डोळसे, अनिल जाधव, श्याम राजाराम कातोरे, प्रदीप वैद्य, मुकुंद बाविस्कर, अनिल जाधव, साहेबराव आव्हाड, रवी पेखळे, शांताराम खांदवे, श्याम राजाराम कातोरे, प्रदीप वैद्य, किरण भडांगे, अमोल दिनकर पाटील, अनिल घुगे, वाल्मीक मोकळ, विकी भुजबळ, सुरेश नाना भोजने, भगवान बारगजे, नितीन गायकवाड, बाळासाहेब जगताप, शरद पवार, कैलास शिंदे, विष्णू वैराळ, सचिन चौधरी सर्व समित्यांचे पदाधिकारी व सदस्य कार्यकर्ते आणि जिल्हा निवासी संत, महंत, जिल्हा निवासी तपस्विनी, यासह सर्व शिक्षुक, पुजारी, वासनिक, साहित्यिक, सद् भक्त पंथातील सर्व मंडळे संस्था व पदाधिकारी आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
Mahanubhav Pantha Dharmasabha Marathi Language