नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भगवान श्री चक्रधर स्वामी अष्टशताब्दी जन्मोत्सव व अखिल भारतीय महानुभाव संमेलन सोमवार, २९ ते बुधवार दिनांक ३१ ऑगस्ट रोजी डोंगरे वस्तीगृह मैदान येथे आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात तीन दिवस विविध धार्मिक, अध्यात्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम होणार आहेत.
मंदीराचे उद्घाटन -नाशिक जिल्हा निवासी साधक, संत व भक्त परिवाराच्या प्रयत्नातून भगवान श्री चक्रधर स्वामींच्या अष्टशताब्दी जन्मोत्सव अखिल भारतीय महानुभाव संमेलनाचे देशपातळीवर आयोजन करण्यात आले असून सदर कार्यक्रमात भगवान श्री चक्रधर स्वामींच्या चरण स्पर्शाने पावन झालेल्या गंगा गोदावरीच्या नदीपात्रातील ‘ढगातळी आसन ‘ या स्थानावरील मंदिराचा उद्घाटन समारंभ देखील या निमित्त संपन्न होणार आहे.
विविध धार्मिक – या निमित्ताने धर्मसभा, संत महंतांची मिरवणूक व शोभायात्रा, भजन, कीर्तन, कथाकथन, प्राचीन, काव्यवाचन, कवी संमेलन व स्वामींच्या तत्त्वज्ञानावर चर्चा आणि मार्गदर्शनाचे आयोजन केलेले आहे. या संमेलनास संपूर्ण देशभरातून संत, महंत, भिक्षुक, वासनिक, साहित्यिक, लेखक, कवी व साधक वृंद उपस्थित राहणार आहेत.
महानुभाव पंथातील आचार्य गणांची उपस्थिती :या संमेलनप्रसंगी महानुभाव पंथातील प्रमुख आचार्य तथा महंत उपस्थित राहणार आहेत, यात प.पू.प.म.श्री.बिडकर बाबा, प.पू.प.म.श्री.लोणारकर बाबा,प.पू.प.म.श्री.खामणीकर बाबा, प.पू.प.म.श्री. विध्दांस बाबा,
प.पू.प.म.श्री. कारंजेकर बाबा, प.पू.प.म.श्री. लासुरकर बाबा या सर्वांची आपल्या शिष्यांसह वंदनीय उपस्थिती लाभणार आहे.
संमेलनाच्या समारोपप्रसंगी राजकीय मान्यवरांची हजेरी असणार आहे. त्यात एकनाथजी शिंदे (मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य),
देवेंद्रजी फडणवीस (उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य ), चंद्रकांत दादा पाटील (कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य ),
रावसाहेब दानवे (केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री ), भारतीताई पवार ( केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री ), भागवत कराड ( केंद्रीय अर्थ राज्यमंत्री ), शरदरावजी ढोले (अखिल भारतीय धर्म जागरण संयोजक ), गिरीशभाऊ महाजन ( कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य ), पंकजाताई मुंडे ( राष्ट्रीय सचिव भाजपा तथा माजी मंत्री ), चंद्रशेखर बावनकुळे (प्रदेशाध्यक्ष भाजपा, महाराष्ट्र राज्य ), राधाकृष्ण विखे पाटील (कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य ), दादाजी भुसे (कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य ), श्रीकांत भारतीया ( संघटक, सरचिटणीस महाराष्ट्र भाजपा ), जितुभाई चौधरी (जलसंपदा मंत्री गुजराज राज्य ), जयकुमार रावल ( माजी मंत्री महाराष्ट्र राज्य ), अविनाशजी ठाकरे (उपाध्यक्ष, ओबीसी महासंघ ), खासदार श्रीमती कमलाबेन डेलकर (सिलवासा ) आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
महानुभाव पंथा बद्दल सर्व सामान्य जनतेला माहिती व्हावी, त्याचा प्रचार प्रसार व्हावा, अभ्यास व्हावा, परिसंवाद घडावेत, यासाठी या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे, हीच या मागची प्रमुख भूमिका आणि उद्देश आहे. या संमेलनाची जय्यत तयारी सुरू असून डोंगरे वस्तीगृहावर भव्य डोम उभारण्यात येत आहे या संमेलनानिमित्त विविध धार्मिक वस्तूंचे स्टॉल तसेच धार्मिक पुस्तकांचे स्टॉल आणि पूजेच्या साहित्याची दुकाने देखील थाटण्यात येणार आहेत.
या संमेलनात केवळ राज्यातील नव्हे तर देशभरातील विविध प्रांतातील संत, महंत उपस्थित राहणार आहेत. तसेच जिल्हा निवासी सर्व संत, महंत, जिल्हा निवासी सर्व तपस्विनी या सर्वांचा या संमेलनात सहभाग आहे. अखिल भारतीय महानुभाव संमेलनास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन या समारंभाचे मार्गदर्शक – प. म. श्री. सुकेणेकर बाबा , प. म. श्री. चिरडे बाबा, म. श्री. कृष्णराज बाबा मराठे आयोजक व स्वागतोत्सुक – मा. आमदार बाळासाहेब सानप, मा. श्री. दिनकर अण्णा पाटील, मा. श्री. दत्ता नाना गायकवाड, मा. श्री. प्रकाश शेठ घुगे ( सचिव ), मा. श्री. प्रकाश शेठ ननावरे (खजिनदार ), प्रभाकर आप्पा भोजने, मा. श्री अरुण महानुभव मा. श्री. विश्वास का. नागरे, तसेच सर्व समित्यांचे पदाधिकारी व सदस्य कार्यकर्ते आणि जिल्हा निवासी संत, महंत, जिल्हा निवासी तपस्विनी, यासह सर्व शिक्षुक, पुजारी, वासनिक, साहित्यिक, सब भक्त पंथातील सर्व मंडळे संस्था व पदाधिकारी, भाविक आदींनी केले आहे.