प्रयागराज – अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष आणि निरंजनी आखाड्याचे महंत नरेंद्र गिरी यांच्या संशयास्पद मृत्यूचे कारण समोर आले आहे. एक अश्लील व्हिडिओ दाखवून त्यांना ब्लॅकमेल केले जात होते हे त्यांच्या सुसाइड नोटवरून स्पष्ट झाले आहे. अश्लील व्हिडिओ प्रसारित करून धमकावण्यात एका भाजप नेत्याची संशयास्पद भूमिका असल्याचा दावा मठाशी संबंधित एका जवळच्या भक्ताने केला आहे. आनंद गिरी यांना पुन्हा बोलावण्यासाठी आणि काही वसुलीसाठी हे कृत्य करण्यात आले. परंतु या सर्व घटनांमुळे महंत नरेंद्र गिरी इतके दुःखी झाले की त्यांनी आपला जीवच दिला.
नरेंद्र गिरी यांच्या सुसाइड नोटमध्ये लिहितात, कॉम्प्युटरच्या माध्यमातून कोणत्यातरी महिला किंवा मुलीशी वाईट कृत्य करताना माझा फोटो लावून व्हायरल करणार असल्याची माहिती हरिद्वारहून मिळाली. याबाबत स्पष्टीकरण देऊ असा विचार केला, परंतु तोपर्यंत बदनाम होऊन जाईल. पोलिसांच्या तपासात सर्व सत्य बाहेर येईल, परंतु खूप उशीर झालेला असेल. आपले दुःख लिहिताना त्यांना कारवाईची मागणी केली आहे.
या प्रकरणात मठाशी संबंधित एका व्यक्तीने सांगितले, की नरेंद्र गिरी यांना बदनाम करून आनंद गिरी यांचे पुनरागमन करण्याचे नियोजन करण्यात आले होते. दोघांमधील दुरावा मिटविण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु मने जुळली नाहीत. आनंद गिरी यांचे पुनरागमन होण्याची शक्यता हळूहळू संपत आली होती. त्यामुळे नरेंद्र गिरी यांना घाबरविण्याचा प्रयत्न करण्यात आला. ते कोणालाच घाबरणार नाही हे सर्वांनाच टाऊक होते. कोणतीही उणीव दिसली नाही म्हणून त्यांचा बनावट व्हिडिओ बनविल्याची अफवा पसरविण्यात आली. हरिद्वार येथून अश्लील व्हिडिओ जारी होण्याचा दबाव होता, असे त्यांच्या नोटवरून स्पष्ट होत आहे. सारखा फोन करून त्यांना घाबरविले जात होते.