विशेष प्रतिनिधी, दिल्ली
अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर धार्मिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून यासंदर्भात त्यांचे शिष्य आनंद गिरी यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर पोलिसांच्या हाती अनेक महत्त्वाचे संकेत मिळाले असल्याचे सांगितले जात आहे.
परंतु महंत नरेंद्र गिरी महाराज हे कायमच वादग्रस्त राहिले आहेत. देशभरातील लाखो संत – महंतांची सर्वोच्च संस्था असलेल्या आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी हे गेल्या दीड दशकाहून अधिक काळ सतत वादाच्या भोवऱ्यात आहेत. बाघंबरी गादीवर विराजमान झाल्यानंतर २००४ पासून त्यांच्या वादांची मालिका सुरू झाली आणि त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत राहिली. कधी पोलिसांशी, कधी राजकारण्यांशी, कधी संतांशी त्यांचे भांडण झाले. अलीकडेच त्यांचा सर्वात खास शिष्य आनंद गिरी यांच्यासोबतचा वाद खूप चर्चेत होता. महंत नरेंद्र गिरी यांच्याशी संबंधित वाद आरोप व कारणे जाणून घेऊ या…
– महंत नरेंद्र गिरी आणि त्यांचे सर्वात महत्वाचे शिष्य आनंद गिरी यांच्यातील अंतर हरिद्वार कुंभमेळ्यापासून वाढले. शिष्य आनंद गिरी यांनी मठ-मंदिराच्या निधीचा गैरवापर केल्याचा आरोप करत स्वामी आनंद गिरी यांना बाघंबरी गादी मठ आणि बडा हनुमान मंदिरात प्रवेश करण्यास नरेंद्र गिरी यांनी मनाई केली होती. यानंतर दोन्ही बाजूंकडून आरोप-प्रत्यारोप अनेक दिवस चालले. अखेर २६ मे रोजी लखनौमध्ये आनंद गिरी यांनी गुरुचे पाय धरून माफी मागितली.
– श्री निरंजनी पंचायती आखाडाचे सचिव महंत आशिष गिरी यांच्या दि. १७ नोव्हेंबर २०१९ संशयास्पद मृत्यूवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले. मूळचे पिथौरागढचे, आशिष गिरी दारागंज स्थित श्री निरंजनीच्या पंचायती आखाडाच्या आश्रमात राहत होते. मृत्यूनंतर काही लोकांनी महंत नरेंद्र गिरींवरही प्रश्न उपस्थित केले होते. मात्र, नंतर पोलिसांच्या तपासात काहीही निष्पन्न झाले नाही.
– नरेंद्र गिरी यांच्याशी २०१२ मध्ये हंदियाचे सपा नेते आणि आमदार महेश नारायण सिंह यांच्याकडून जमीन खरेदीवरून वाद झाला होता. त्यामुळे महंत यांनी जॉर्ज टाऊनमध्ये सपा नेते महेश नारायण सिंह, शैलेंद्र सिंह, हरिनारायण सिंह आणि ५० अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला होता. दुसऱ्या बाजूने नरेंद्र गिरी, आनंद गिरी आणि इतर दोघांविरोधात ही फिर्याद दाखल केली होती.
– गुरु महंत नरेंद्र गिरी यांच्याशी झालेल्या वादानंतर योग गुरु स्वामी आनंद गिरी यांनी मे महिन्यात मंदिराच्या पैशांचा गैरवापर केल्याचा आरोप करत दोन व्हिडिओ जारी केले. एका व्हिडिओमध्ये बार आणि मुली नाचत होत्या आणि मोठ्या हनुमान मंदिर आणि मठाशी संबंधित लोक त्यांच्यासोबत नाचत होते. तसेच बार-बालावर नोटांचा पाऊस पडत होता. दुसऱ्या व्हिडिओमध्ये, एका विवाह मंत्रांच्या दरम्यान नोटांचा पाऊस पडत होता. तेव्हा यामध्ये महंत नरेंद्र गिरी वधू -वरांना आशीर्वाद देत होते.
– दिल्ली परिसरच्या सर्वात मोठ्या डिस्कोसह नोएडामधील बिअर बारचे संचालक सचिन दत्ता उर्फ यांना ३१ जुलै २०१५ रोजी महामंडलेश्वर पदवी देत सच्चिदानंद गिरी बनवण्याच्या वादात नरेंद्र गिरी यांचे नावही आले. तत्कालीन कॅबिनेट मंत्री शिवपाल यादव आणि पर्यटन मंत्री ओम प्रकाश सिंह यांच्या उपस्थितीत नरेंद्र गिरी यांनी सचिन यांचा पट्टाभिषेक करून निरंजनी आखाड्याचे महामंडलेश्वर बनवले.
– महंत स्वामी नरेंद्र गिरी यांचा अंगरक्षक तथा बंदुकधारी शिपाई असलेल्या अजय सिंहवर बेहिशेबी मालमत्तेचा आरोप होता. या शिपायाच्या राहणीमानावर प्रश्न उपस्थित करत लखनौचे आरटीआय कार्यकर्ते डॉ.नूतन ठाकूर यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना पत्र पाठवून चौकशीची मागणी केली होती. अजय सिंहने पत्नीच्या नावावर ६१ लाख किमतीचा फ्लॅट खरेदी केल्याचा आरोप केला गेला होता.
– नरेंद्र गिरी यांनी किन्नर आखाड्याला मान्यता दिली नाही. महंत गिरी म्हणाले की, जगतगुरू शंकराचार्यांनी १३ आखाड्यांची स्थापना केली होती. त्यामुळे १४ व्या आखाडा म्हणून कोणालाही मान्यता देता येणार नाही. तथापि, २०१९ च्या कुंभमेळ्यामध्ये प्रशासनाने निष्पक्षपणे किन्नर आखाड्याला जमीन आणि सुविधा दिल्या होत्या. १३ ऑक्टोबर २०१५ रोजी उज्जैनमध्ये किन्नर आखाड्याची स्थापना झाली. त्यानंतर, २०१६ च्या उज्जैन कुंभमध्ये, या अखाड्याने स्वतंत्रपणे शोभा यात्रा काढली होती.
– महंत नरेंद्र गिरी यांचा परी आखाडाच्या अस्तित्वावरच विश्वास नव्हता. त्यावेळी महंत म्हणाले की, तथाकथित साध्वी त्रिकाल भवंता हिने कोठूनही दीक्षा घेतलेली नाही, ती संन्यासिनी नाही, त्यामुळे परी आखाडा मी मानत नाही. मात्र त्यानंतरही त्रिकाल भवंतांनी महिला संन्यासींसाठी परी आखाड्याची वकिली सुरू ठेवली.
– महंत नरेंद्र गिरी यांना ८ ऑगस्ट २०१८ रोजी नरेंद्र गिरी यांनी धमकी दिल्याप्रकरणी क्रिया योग आश्रमाचे योगी सत्यम यांच्याविरोधात दारागंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. आखाडा परिषदेने योगी सत्यमला बनावट संतांच्या यादीत टाकले होते. त्यामुळे वाद वाढला होता.
– नरेंद्र गिरी यांचा २००४ मध्ये मठ बाघंबरी गादीचे महंत झाल्यानंतर तत्कालीन डीआयजी आर. एन. सिंह यांच्याशी जमीन विकण्याबाबत काही वाद झाला, त्यानंतर सिंह यांनी मंदिरासमोर अनेक दिवस धरणे धरले. मात्र तत्कालीन मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांनी आर.एन.सिंह यांना निलंबित केले, मग त्यानंतर प्रकरण मिटले.