नाशिक – स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांची अखेर उचलबांगडी करण्यात आली. त्यांच्या जागी सुमंत मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. थवील यांच्याविरुध्द मंगळवारी महानगरपालिकच्या सर्वसाधारण सभेत प्रकाश थविल उपस्थितीत नव्हते. या सभेतच त्यांच्या बदलीचा ठराव करण्यात आला होता.
या सभेत नगरसेवकांनी स्मार्ट सिटीच्या कामांबाबत नाराजी व्यक्त केली होती. या सर्व घडामोडीनंतर थविल यांच्या बदली करण्यात आली. त्यांच्या बदलीचे आदेश अपर सचिव सचिन सहस्त्रबुध्दे यांनी काढले होते. थविल यांच्यावर स्मार्ट सिटीच्या कामाबाबत अनेक तक्रारी आहे. त्यांनी चार वर्षापासून रखडलेल्या स्मार्ट रस्त्याचे काम आणि त्यानंतर ठेकेदाराला प्रतिदिन ३६ हजार रुपये दंड रद्द करण्याचा वादग्रस्त निर्णय घेतला होता. तर गोदावरी नदीचे कॅाक्रिटीकरण काढण्याचा विषय सुध्दा वादग्रस्त ठरला होता.