नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– नाशिक सायकलिस्टस् फाऊंडेशनच्या ६ सदस्यांची नाशिक ते प्रयागराज १३०० कि.मी.ची सायकल यात्रा सफर केली.
१८ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता सुरु झालेली ही सायकल यात्रा २१ रोजी सहाव्या प्रहरी पहाटे दिड वाजता पूर्ण झाली. या सायकल यात्रेचा प्रवास येवला, छ.संभाजीनगर, नागपूर, जबलपूर, कटनी, रीवा या मार्गाने प्रवास केला. जबलपूर पासूनच प्रचंड वाहतूक सुरु झाली. प्रत्येक ठिकाणी गर्दीच गर्दी, धुळीचे साम्राज्य, ट्रॅफिक जॅम सुरु झाला. काही ठिकाणी चहा मिळणे सुद्धा दुरापास्त होते. जेवण तर कसेबसे बनवून दिले जात होते. हॉटेलमध्ये रुम खूप महाग व मिळतही नव्हते. काही ठिकाणी पाणीच संपलेले. १५० किमी अगोदर पासून पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या बघावयास मिळाल्या. मिळेल त्या ठिकाणी लोक थांबून आपली व्यवस्था करतांना दिसले.
प्रयाग राज १५ किमी राहिल्यानंतर मात्र वाहतूक एकदम ठप्प झाली. जवळ जवळ दिड तास पायी प्रवास करत आम्ही त्रिवेणी संगमावर पोहचलो. महाकुंभ नगरीची लख्ख रोषणाई नजरेत भरण्या सारखी होती. नदीवर अनेक पूल बांधण्यात आले होते. ठिकठिकाणी आखाडे, मठ, रैनबसेरा, विश्राम व भोजन व्यवस्था होती. असंख्य मोबाईल टॉयलेट्स, पाण्यासाठी हात उपसा पंप, वैद्यकीय मदत कक्ष, सुरक्षारक्षक, स्वच्छता कर्मचारी, मार्गदर्शक मदतीला हजर होते. बारा ज्योतिर्लिंग, चार धाम, राम मंदिर अशा अनेक धार्मिक वास्तुंच्या प्रतीकृती सनातन धर्माची साक्ष देत होत्या. एकंदरीत सर्व वातावरण पवित्र व मंगलमय होते.
अशा पवित्र वातावरणात आम्ही संगमात आस्थेची डुबकी मारली. त्र्यंबकेश्वर येथून आणलेले पवित्र तीर्थ विधीवत पूजा करुन त्रिवेणी संगमात अर्पण केले व उत्तर आणि दक्षिण गंगेचे अनोखे मिलन घडविले. व आदरपूर्वक नाशिक च्या गोदामातेला गंगामातेचा प्रसाद म्हणून कुंभात पवित्र जल घेतले
जल है तो कल है,
जल ही जीवन है,
नदिया हमारी माता है – कैसा पवित्र नाता है, सर्वे भवन्तु सुखिन: सारख्या घोषवाक्यांनी जनजागृती व प्रार्थना केली. उपस्थित जनसमुदाय तसेच निरंजन आखाडा व शांती- प्रगती आखाड्यात जाऊन नाशिक येथे २०२७ ला संपन्न होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी जाहीर आमंत्रण दिले. नाशिकचे योगगुरू श्री नंदू देसाई गुरुजी यांनी सोबत दिलेल्या २००० लाडूंचे देखील वाटप करण्यात आले.
अखिल भारतीय पत्रकार संघ तसेच उत्तर प्रदेश सरकारच्या सांस्कृतिक प्रसिद्धी व माहिती खात्याच्या प्रमुखांना आमच्या उपक्रमाची माहिती दिली. त्या सर्वांनी खूप कोतुक केले. मिळेल त्या ठिकाणी लोक थांबून आपली सोय करतांना दिसले. प्रयाग राज १५ किमी राहिल्यानंतर मात्र वाहतूक एकदम ठप्प झाली. जवळ जवळ दिड तास पायी प्रवास करत आम्ही त्रिवेणी संगमावर पोहचलो
महाकुंभ नगरीची लख्ख रोषणाई नजरेत भरण्या सारखी होती. नदीवर अनेक पूल बांधण्यात आले होते. ठिकठिकाणी आखाडे, मठ, रैनबसेरा, विश्राम व भोजन व्यवस्था होती. असंख्य मोबाईल टॉयलेट्स, पाण्यासाठी हात उपसा पंप, वैद्यकीय मदत कक्ष, सुरक्षारक्षक, स्वच्छता कर्मचारी, मार्गदर्शक मदतीला हजर होते. बारा ज्योतिर्लिंग, चार धाम, राम मंदिर अशा अनेक धार्मिक वास्तुंच्या प्रतीकृती सनातन धर्माची साक्ष देत होत्या.
अशा पवित्र व मंगलमय वातावरणात आम्ही संगमात आस्थेची डुबकी मारली. त्र्यंबकेश्वर येथून आणलेले पवित्र तीर्थ विधीवत पूजा करुन त्रिवेणी संगमात अर्पण केले व उत्तर आणि दक्षिण गंगेचे अनोखे मिलन घडविले. आदरपूर्वक नाशिक च्या गोदामातेला गंगामातेचा प्रसाद म्हणून कुंभात पवित्र जल घेतले .
नियोजित उपक्रम यशस्वीपणे पार पडल्यामुळे कृतकृत्य झालो. व परतीचा प्रवास गाडीने पुर्ण करत आज दिनांक २२ फेब्रुवारी २०२५ रोजी संध्याकाळी ७ वा. पंचवटी तील राम कुंडावर आगमन झाले येथे नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष किशोर काळे व सदस्य परीवार यांनी स्वागत केले. रामकुंडावर पुरोहित संघाचे पंडीत अलोक गायधनी यांनी मंत्र घोषात संकल्पपुर्ती केली व सदस्यांनी त्रिवेणी संगमाचे पवित्र जल गोदावरी मातेस अर्पण केले.