रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

महाज्योतीच्या एमएच सेट परीक्षा प्रशिक्षण योजनेमुळे इतके विद्यार्थी यशस्वी.. तुम्हीही घ्या लाभ…

by India Darpan
ऑगस्ट 18, 2023 | 12:57 pm
in स्थानिक बातम्या
0
Mahajyoti 400x375 1

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती, नागपूर व सीआरजी अकादमी फॉर सक्सेस, पुणे या संस्थेमार्फत इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यासाठी युजीसी नेट, सीएसआयआर नेट, एमएच सेट परीक्षापूर्व प्रशिक्षण योजना राबविण्यात येते. या प्रशिक्षण योजनेचा लाभ घेतलेल्या 1 हजार 207 विद्यार्थ्यांपैकी 92 विद्यार्थी यशाचे मानकरी ठरले आहेत. अशी माहिती महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.

लक्षीत प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्राध्यापक, सहायक प्राध्यापक पदाची संधी मिळावी या उद्देशाने युजीसी नेट, सीएसआयआर नेट, एमएच सेट परीक्षापूर्व प्रशिक्षण योजना सुरु करण्यात आली आहे. याकरीता दि. 15 सप्टेबर 2022 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. प्रशिक्षणास इच्छुक नॉनक्रेमीलेअर उत्पन्न गटातील उमेदवारांकडून महाज्योतीच्या संकेतस्थळावर अर्ज मागविण्यात आले होते. या प्रशिक्षणासाठी एकूण 1 हजार 556 विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले. निवड प्रक्रियेत पात्र ठरलेल्या 1 हजार 207 विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाचा लाभ घेता आला. यापैकी 1 हजार 127 विद्यार्थ्यांना ऑफलाईन तर 80 विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले. यातील 92 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.

प्रशिक्षण कालावधीत एमएच सेट परीक्षा प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, आवश्यक व आकस्मिक गरजेकरीता सहा महिने विद्यावेतन देण्यात आले. मोफत प्रशिक्षणात निवडण्यात आलेल्या विषयाचे वर्ग, विषयवार चर्चा, प्रश्नपत्रिका सोडवून घेण्यात आल्या. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये प्रियंका ठाकरे, परमेश्वर दास, वैभव कापसे, भुपेंद्र ढाले, महेश भांडे, भावीका शिंदे, अश्विनी वडे, उमेश पालवे, रिना चव्हाण, खुशवंत नांथे, विशाल आदमने, अपेक्षा गावंडे, विष्णू गोरे, मनिषा तोरकडे, विकास पिसे या व इतर विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

सहकार व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे तथा अध्यक्ष महाज्योती, नागपूर यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच महाज्योतीतर्फे राबविण्यात येणाऱ्या युजीसी नेट, सीएसआयआर नेट, एमएच सेट परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनेचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे. व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

महाज्योतीमुळे आई-वडीलांचे शिकून मोठा होण्याचे स्वप्न साकार झाले.
वृत्तपत्राच्या माध्यमातून महाज्योतीच्या युजीसी नेट/सीएसआयआर नेट/ एमएच सेट परीक्षापूर्व प्रशिक्षण योजनेची माहिती मिळाली. सुचनेनुसार अर्ज करुन प्रशिक्षणास पुणे येथे पाठवण्यात आले. सहा महिन्याच्या प्रशिक्षण कालावधीत महाज्योतीकडून विद्यावेतन देण्यात आले. विद्यावेतनाने पुण्यात राहण्या, खाण्याची, शिक्षणाची, शैक्षणिक साहित्याची सोय करता आली. याआधारे सेट परीक्षा पास करता आली. आज मी कॉमर्स कॉलेजला सहाय्यक प्राध्यापक म्हणून कामाला लागलो. आई-वडीलांचे शिकून मोठा होण्याचे स्वप्न महाज्योतीमुळे पुर्ण झाले आहे.
-वैजनाथ भारत इडोळे, आडोळी, वाशीम

महाज्योती गरीबातल्या गरीब विद्यार्थ्यांपर्यंत पोहचून शैक्षणीक, आर्थिक मदत करत आहे.
मी रसायनशास्त्र हा विषय घेऊन सेट पास झालेले आहे. सेट मधे दोन विषय असतात एक कॉमन असतो आणि दुसरा निवडायचा असतो. कॉलेजमधील शिक्षकांकडून महाज्योतीच्या युजीसी नेट/सीएसआयआर नेट/ एमएच सेट परीक्षापूर्व प्रशिक्षण योजनेची माहिती मिळाली. मार्गदर्शन मिळाले. पुण्यातील प्रशिक्षणाच्या कालावधीत विद्यावेतन मिळाले. त्याने पुण्यात राहण्या, खाण्याची, अभ्यासाची सोय झाली. माझ्यासह माझ्यासारखे बरेच विद्यार्थी होते जे महाज्योतीच्या या योजनेचा लाभ घेत होते. आणि ते सारेच खुप सामान्य घरातून आलेले होते. महाज्योती गरीबातल्या गरीब विद्यार्थ्यांपर्यंत पोहचून त्याला शैक्षणिक, आर्थिक मदत करत आहे. घडवित आहे.
-प्रणीता जावळे, जळगाव

Mahajyoti Set Exam Training Scheme Student Success
Government Category

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

जेष्ठ तमाशा कलावंत शांताबाई अर्जून लोंढे-कोपरगावकर यांना शासनाची पाच लाखांची मदत

Next Post

तुमची समस्या मंत्री नितीन गडकरींना सांगायची आहे? या दिवशी, येथे नक्की भेटता येईल..

Next Post
FwpMIA akAEUWjT

तुमची समस्या मंत्री नितीन गडकरींना सांगायची आहे? या दिवशी, येथे नक्की भेटता येईल..

ताज्या बातम्या

trump 1

इराण – इस्त्रायल युध्दात आता अमेरिकेची उडी…तीन अणुस्थळांवर केले हवाई हल्ले

जून 22, 2025
cbi

सीबीआयने बिहार झारखंडमध्ये ७ ठिकाणी टाकले छापे…१०० कोटी बनावट जीएसटी रिफंडचे प्रकरण

जून 22, 2025
Gt ArXoXMAArHyz e1750556062941

शोलेत अमजद खान यांना सचिन पिळगावकर याने संवादफेक किवा डायलॉग फेकण्याची स्टाईल शिकवली…जितेंद्र आव्हाड यांची ही पोस्ट चर्चेत

जून 22, 2025
crime1

कारमधून आलेल्या कुटुंबियांनी लाकडी बॅट व लाठ्याकाठ्यांनी केली बेदम मारहाण…नेमकं घडलं काय

जून 22, 2025
Untitled 71

इस्राएलने केलेल्या हल्ल्यांमुळे अणु प्रदूषणाचा धोका…राफेल ग्रोसी

जून 22, 2025
WhatsApp Image 2025 06 21 at 17.17.54 1024x542 1

सहा रेडिओ जॉकींनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी शिघ्र कविता करीत गाणेही गायले…

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011