रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

‘महाज्योती’तर्फे आयबीपीएस-एलआयसीच्याअधिकारी पदासाठी पूर्वतयारी प्रशिक्षण… असा घ्या लाभ

by India Darpan
ऑगस्ट 23, 2023 | 5:24 am
in संमिश्र वार्ता
0
Mahajyoti 400x375 1

नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व‎ प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर या‎ संस्थेमार्फत इतर मागास वर्ग विमुक्त‎ जाती-भटक्या जमाती व विशेष मागास‎ प्रवर्गातील पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना स्पर्धात्मकयुगात समान संधी प्राप्त व्हावी याकरिता परीक्षेची पूर्वतयारीकरिता प्रशिक्षण देण्यात येते. याचाच भाग म्हणून यंदा 2023-24 सालात इन्स्टिट्यूशन ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शनच्या (आयबीपीएस) प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) तसेच भारतीय जीवन बीमा निगम (एलआयसीे)तर्फे असिस्टंट अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर (एएओ) या पदासाठी महाज्योतीमार्फत नागपूर व छत्रपती संभाजी नगर या‎ दोन शहरात एकूण 600 विद्यार्थ्यांना मोफत अनिवासी प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

यासाठी विद्यार्थ्यांना येत्या 21 स्पटेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. विशेष म्हणजे, 6 महिने घेण्यात होणाऱ्या या प्रशिक्षणासाठी महाज्योतीतर्फे निवड झालेल्या विद्यार्थी ज्यांची हजेरी 75 टक्के असणार अश्याना दरमाह 6 हजार रूपए विद्यावेतन संस्थेमार्फत देण्यात येणार आहे. अशी माहिती महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. राजेश खवले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

त्यांनी सांगितले की, महाज्योती या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीयकृत बॅंक आणि एलआयसीच्या होणाऱ्या अधिकारी पदांच्या परीक्षेत यश प्राप्त करण्यासाठी सुवर्णसंधी प्राप्त होणार आहे. या प्रशिक्षणाचा‎ लाभ घेण्यासाठी उमेदवार हा इतर मागास‎ वर्ग विमुक्त जाती-भटक्या जमाती व‎ विशेष मागास प्रवर्गापैकी असावा.‎ तसेच उमेदवार हा नाॅन क्रिमीलेअर उत्पन्न गटातील असावे. जे विद्यार्थी हे पदवीचे शिक्षण पूर्ण केलेल्या किंवा पदवीच्या अंतिम वर्षाला असणारे विद्यार्थी सुद्धा या प्रशिक्षणकरिता ऑनलाईन अर्ज करू शकतात. उपरोक्त होणाऱ्या प्रशिक्षणाकरिता 30 टक्के जागा महिलांसाठी आरक्षित आहे. तसेच अनाथांसाठी 1 टक्के जागा आरक्षित करण्यात आली आहे. या प्रशिक्षणची वयोमर्यादा ही 20 ते 33 असणार असल्याचेही महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. राजेश खवले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले.

 21 सप्टेंबरपर्यंत मागविले ऑनलाईन अर्ज
महाज्योतीच्या संकेतस्थळावर सूचना फलक (नोटीस बोर्ड) या पर्यायात जाऊन ‘आयबीपीएस-पीओ, एलआयसी-एएओ-2023-24’ ला भेट द्यायची आहे. यानंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येणार. तसेच अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे स्वाक्षांकीत करुन स्पष्ट दिसतील असे स्कॅन करुन अपलोड करावे. सर्व कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतरच विद्यार्थ्यांचा अर्ज हा स्वीकृत होणार. तसेच पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची पडताळणी परीक्षा घेऊन प्रशिक्षणसाठी निवड करण्यात येणार, अशी माहिती महाज्योतीतर्फे देण्यात आली.

 अर्ज करतांना लागणार ही कागदपत्रे
इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करतांना आधार कार्ड, जातीचा प्रमाणपत्र, वैध नाॅन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र, 12 वी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र, पदवी उत्तीर्ण गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र, पदव्युत्तर उत्तीर्ण गुणपत्रक किंवा पदव्युत्तरच्या शेवटचा वर्षाचे प्रमाणपत्र, दिव्यांग असल्यास 40 टक्के पेक्षा जास्त प्रमाणात असलेल्या दिव्यांगत्वाचा सक्षम प्राधिकाऱ्याचा दाखला आणि बँकेचे खाते जे आधारकार्ड क्रमांकाशी संलग्न असावेत, असेही महाज्योतीतर्फे कळविण्यात आले आहे.

 अधिक माहितीसाठी कॉल सेंटरची सुविधा
अर्ज भरतांना विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नये म्हणून महाज्योतीतर्फे काॅल सेंटरची सुविधा सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी 0712-2870120/21 या संपर्क क्रमांकावर किंवा इमेल आईडी: महाज्योतीनीट24 /जिमेल.काॅम वर आपल्या अर्जातील साषंकता दुरू करता येणार. विद्यार्थ्यांना 21 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज भरण्याचे आवाहन संस्थेकडून करण्यात आले आहे. टपाल किंवा ई-मेल व्दारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही, असेही महाज्योतीकडून सांगण्यात आले आहे.

Mahajyoti IBPS LIC Officer Training Student

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

श्री विष्णु पुराण… जन्हू राजा जेव्हा गंगा नदीच पिऊन टाकतो…

Next Post

मनपा शाळेच्या शिक्षकाचा विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार… पालकांनी दिला चोप…

India Darpan

Next Post
प्रातिनिधिक फोटो

मनपा शाळेच्या शिक्षकाचा विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार... पालकांनी दिला चोप...

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्ती अनपेक्षित घडामोडीमुळे त्रस्त होणार, जाणून घ्या, सोमवार, २३ जूनचे राशिभविष्य

जून 22, 2025
IMG 20250622 WA0424 1

नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिकला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचा होणार विकास….

जून 22, 2025
World Olympic Day chief Guest welcome by Nashik Sports Persons 1

पद्मश्री पुरस्कार, अर्जुन पुरस्कार प्राप्त ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते हॉकीपटू जफर इक्बाल यांचे नाशिकमध्ये आगमन…

जून 22, 2025
rain1

राज्यात पुढील काही दिवसात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता

जून 22, 2025
Untitled 74

महिलांच्या सशक्तीकरणाची नवी चळवळ…..‘बहिणाई मार्ट’च्या भूमिपूजनाने स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू

जून 22, 2025
CrestEH6T

भारतीय नौदलाच्या ताफ्यात ही युद्धनौका सामील होणार; रशियात होणार समारंभ

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011