मुंबई – राज्यात बेरोजगारी वाढत असताना, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (MAHADISCOM) विद्युत सहाय्यक पदांसाठीची भरती प्रक्रिया राबवणार आहे. या प्रक्रियेत एकूण पाच हजार पदे भरले जाणार आहेत. यासाठी ऑनलाइन अर्ज भरता येणार असून त्यासाठी https://www.mahadiscom.in/en/home/ या संकेतस्थळावर भेट देऊ शकतात.
MAHADISCOM नुसार, ही प्रक्रिया १८ फेब्रुवारीपासून सुरू झाली असून, १८ मार्चपर्यंत ऑनलाइन प्रक्रिया सुरू राहणार आहे. ज्या उमेदवारांना अर्ज करायचा असेल त्यांनी योग्य तपशील भरून दिलेल्या मुदतीत अर्ज जमा करावा. त्यामध्ये दोष आढळल्यास अर्ज नाकारला जाईल. पाच हजार पदांमध्ये १६९३ सर्वसाधारण, १५०० महिला, २५० खेळाडू, ७५० माजी कर्मचारी, प्रोजेक्टटेड २५९, भूकंपग्रस्त ९९, शिकाऊ उमेदवार ५०० पदं भरली जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता
MAHADISCOM च्या अधिसूचनेनुसार, उमेदवार बारावीची परीक्षा उत्तीर्ण व नॅशनल ट्रेड ट्रेनिंग सर्टिफिकेट धारक असणे आवश्यक आहे. उमेदवाराचं वय १८ ते २७ असावे.