इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
म्हाडाने नाशिक विभागात १४८५ तर छत्रपती संभाजीनगरमध्ये १३५१ घरांसाठी लॅाटरी जाहीर केली आहे. या लॅाटरीमध्ये अल्प उत्पन्न गट आणि मध्यम उत्पन्न गटातील लोकांसाठी केवळ ५ लाख किमतीपासून घरे उपलब्ध केली जाणार आहेत. या लॅाटरीची अर्ज प्रक्रिया ३० जून रोजी सुरु झाली असून त्यासाठी शेवटची तारीख ११ ऑगस्ट आहे. म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. यानंतर १८ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्जाची यादी प्रसिध्द केली जाईल. २५ ऑगस्ट रोजी अंतिम पात्र यादी जाहीर केली जाणार आहे.
नाशिकमध्ये एलआयजी म्हणजे अल्प उत्पन्न गाटासाठी १२.६८ लाख ते १३.५५ इतक्या किमतीत घरे उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. वडाळा शिवारामधील पार्श्वनाथ प्रोजेक्ट या ठिकाणी ही घरे उपलब्ध असणार आहे. तसेच आडगाव शिवारामधील प्रणव गार्डनमध्येही अल्प उत्पन्न गटासाठी घरे उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. त्याची किंमत ११.९४ लाख ते १५.३१ लाख इतकी असणार आहे. अहिल्यानगरमधील सिव्हिल हुडको, सावेडी या ठिकाणी मध्यम उत्पन्न गटासाठी घरे उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. या घराची किंमत फक्त ५.४८ लाख इतकी असणार आहेत.
नाशिक मंडळातील २० टक्के सर्वसमावेश योजनेतील ६३ सदनिका व म्हाडा गृहनिर्माण योजनेतील ४ सदनिकांचा सोडतीत समावेश आहे. या सोडतीत अत्यल्प उत्पन्न गटाकरिती ११४८ सदनिका, अल्प उत्पन्न गटाकरिता २६६ सदनिका, मध्यम उत्पन्न गटाकरिता ४ सदनिकांचा समावेश आहे. या लॅाटरीची अर्ज प्रक्रिया ३० जून रोजी सुरु झाली असून त्यासाठी शेवटची तारीख ११ ऑगस्ट आहे. म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे.