इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – महाभारतातील मामा शकुनीची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते गुफी पेंटल यांनी जगाचा निरोप घेतला. नुकतेच त्यांना हृदयविकारामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जिथे ५ जून रोजी वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
गुफी पेंटल यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले, परंतु महाभारताने त्यांना जी ओळख दिली ती इतर कोणीही करू शकले नाही. अभिनेत्याच्या निधनावर अनेक सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया व्यक्त करत सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
बॉलिवूड अभिनेत्री निम्रत कौरने ट्विटरवर पोस्ट शेअर करताना गुफी पेंटलचा एक फोटो शेअर केला आहे. शोक व्यक्त करताना तिने लिहिले, “आमच्या बालपणीच्या दिवसांपासून शकुनी मामाला कधीही विसरू शकणार नाही… भारतीय चित्रपट जगतातील एक मोठे योगदान आहे. तुमच्या कुटुंबासाठी प्रार्थना करते, देव त्यांना शक्ती देवो. तुमच्या आत्म्याला शांती देवो. गुफी पेंटलजी.”
अभिनेत्याच्या निधनाची बातमी देताना, गुफी पेंटलचे नातेवाईक आणि अभिनेते हितेन पेंटल यांनी लिहिले, “अत्यंत दु:खाने कळवत आहोत की, गुफी पेंटल (शकुनी मामा) यांचे निधन झाले आहे. तुम्ही नेहमी आमच्या हृदयात असाल.” तुझ्या आत्म्याला शांती लाभो.”
गूफी पँटल यांनी महाभारताव्यतिरिक्त, बहादुर शाह जफर, कर्मफल दाता शनी, अकबर बिरबल, द्वारकाधीश भगवान श्री कृष्ण आणि भारत का वीर पुत्र महाराणा प्रताप यांसारख्या शोमध्ये काम केले.
Mahabharat Shakuni Mama Gufi Pental Death