सोमवार, ऑक्टोबर 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

महाभारतातील ‘भीम’ जगतोय हलाखीत; सरकारकडे केली ही मागणी

डिसेंबर 26, 2021 | 11:14 am
in मनोरंजन
0
mahabharat bheem

 

मुंबई – ९० च्या दशकात प्रत्येक भारतीय प्रेक्षकांच्या मनावर गारुड केलेल्या महाभारत या मालिकेतील भीम तुम्हाला आठवतोय का? बी. आर. चोप्रा यांच्या महाभारत मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखेने प्रेक्षकांची मने जिंकली होती. हे गारुड इतके होते की, कलाकार खऱ्या नावाने नव्हे, तर व्यक्तीरेखेच्या नावाने ओळखले जात होते.

महाभारतात भीमाची व्यक्तिरेखा साकारणारे प्रवीण कुमार हे त्यापैकी एक. प्रवीण कुमार यांनी दूरचित्रवाणी मालिका आणि सिनेमांमध्येही काम केले आहे. प्रवीण कुमार हे खेळाडूही होते. त्यांनी आशियायी क्रीडा स्पर्धा, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेतला होता. अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी पदक पटकावले होते. नंतर आपल्या अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. इतके यश मिळवूनही आज प्रवीण कुमार यांची आर्थिक परिस्थिती खूपच हलाखीचीआहे, हे ऐकून तुम्हाला कदाचित धक्का बसेल. पण हे खरे आहे.

सरकारकडे मदतीची मागणी
आर्थिक परिस्थिती हलाकीची झाल्याने जगणे सुसह्य होण्यासाठी प्रवीण कुमार यांनी खेळातील योगदान पाहता सरकारकडे निवृत्तिवेतनाची मागणी केली आहे. त्यांना बीएसएफकडून निवृत्तीवेतन मिळत आहे. परंतु त्यांच्या दररोजच्या जगण्यासाठी हा निधी खूपच अपुरा पडत आहे. पंजाबमधील जितके सरकार आले त्या सर्वांबद्दल त्यांची तक्रार आहे. आशियायी क्रीडा स्पर्धेत पदक जिंकणार्या खेळाडूला निवृत्तीवेतन देण्यात आले, परंतु त्यांना मिळाले नाही. त्यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही सहभाग घेतला होता, तरीही निवृत्तीवेतन मिळाले नाही, अशी त्यांची तक्रार आहे.

सगळेच विसरले
एनबीटी या संकेतस्थळाशी बोलताना प्रवीण कुमार म्हणाले, की मी आता ७६ वर्षांचा असून, घरीच असतो. आजकाल तब्येत चांगली नसते. पत्नी वीणा देखभाल करते. एक असा काळ होता की भिमाला सर्व ओळखत होते. आता सगळेच विसरले आहे. प्रवीण कुमार यांना एक मुलगी असून, ती लग्नानंतर सध्या मुंबईत राहते आहे.

क्रीडा स्पर्धेत सहभाग
प्रवीण कुमार हे हातोडा आणि थाळीफेक या खेळात पारंगत होते. त्यांनी १९६६ मध्ये किंगस्टनमध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सहभाग घेऊन रौप्यपदक जिंकले होते. त्याशिवाय त्यांनी १९६६ आणि १९७० मध्ये झालेल्या आशियायी क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. त्यांनी १९६८ आणि १९७२ मध्ये उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेतला होता. १९७४ मध्ये तेहरान मध्ये आयोजित करण्यात आलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभाग घेतला होता. प्रवीण कुमार म्हणाले, की सर्वकाही सुरळीत सुरू होते. पण नंतर त्यांचे पाठीचे दुखणे सुरू झाले.

अशी मिळाली भिमाची भूमिका
प्रवीण कुमार यांना सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) मध्ये उपकमांडंटची नोकरी मिळाली होती. १९८६ मध्ये त्यांना बी. आर. चोप्रा महाभारत बनवत असून त्यासाठी भिमाची भूमिका साकारणार्या अभिनेत्याची गरज असल्याचा संदेश मिळाला होता. ते बी. आर. चोप्रा यांना भेटण्यासाठी गेले. जसे त्यांनी प्रवीण कुमार यांना पाहिले, ते त्वरित म्हणाले, भिम मिळाला. त्यांची व्यक्तिरेखा इतकी गाजली की प्रवीण कुमार यांचा चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांसाठी मार्ग खुला झाला. त्यांनी ५० हून अधिक चित्रपटात काम केले. तसेच अनेक दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम केले.

राजकारणात प्रवेश
प्रवीण कुमार यांनी राजकारणातही नशीब आजमावले आहे. २०१३ मध्ये त्यांनी आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला होता. दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला होता.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

येत्या १ जानेवारीपासून बँकांच्या या नियमांमध्ये होणार बदल

Next Post

दिग्विजय पुन्हा बरळले ‘सावरकरांच्या मते गोमांस खाणे वाईट नाही’; वादंग सुरू

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा नरक चतुर्दशीचा दिवस… जाणून घ्या, सोमवार, २० ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 19, 2025
indian army e1750762947859
महत्त्वाच्या बातम्या

सुवर्णसंधी! भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? येथे मिळेल मोफत प्रशिक्षण…

ऑक्टोबर 19, 2025
messi
महत्त्वाच्या बातम्या

स्वप्न सत्यात येणार… फुटबॉल सम्राट मेस्सीसोबत खेळण्याची सुवर्णसंधी… युवा फुटबॉलपटूंनो फक्त हे करा…

ऑक्टोबर 19, 2025
1002689727
मुख्य बातमी

निवडणूक आयोगाला मतदार याद्या सुधारायला सांगतोय मग, सत्ताधारी यावर का उत्तरं देतायेत? राज ठाकरे कडाडले

ऑक्टोबर 19, 2025
Untitled 79
महत्त्वाच्या बातम्या

उद्या आहे लक्ष्मीपूजन! असे आहे महत्त्व… अशी करा पूजा…

ऑक्टोबर 19, 2025
narak chaturdashi
महत्त्वाच्या बातम्या

इंडिया दर्पण – दीपोत्सव विशेष – आज आहे नरक चतुर्दशी – असे आहे महत्त्व

ऑक्टोबर 19, 2025
IMG 20251018 WA0011
महत्त्वाच्या बातम्या

कांदा प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी चिंचोंडी औद्योगिक वसाहतीत प्रकल्प…

ऑक्टोबर 18, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा रविवारचा दिवस… जाणून घ्या, १९ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 18, 2025
Next Post
digvijay singh

दिग्विजय पुन्हा बरळले 'सावरकरांच्या मते गोमांस खाणे वाईट नाही'; वादंग सुरू

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011