गुरूवार, सप्टेंबर 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

विधान परिषद निवडणूक: शिवसेनेकडून उमेदवारांची घोषणा; यांचा पत्ता कट

by Gautam Sancheti
नोव्हेंबर 20, 2021 | 1:06 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
Shivsena1

मुंबई – विधान परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने उमेदवारांची काल रात्री घोषणा केल्यानंतर आता शिवसेनेने त्यांचे उमेदवार जाहीर केले आहेत. या निवडणुकीसाठी अनेक नेत्यांच्या नावांची चर्चा होती. त्यात विद्यमान आमदार रामदास कदम यांचा समावेश होता. मात्र, अपेक्षेप्रमाणे कदम यांना नारळ देण्यात आला आहे. त्यांच्या जागी माजी आमदार सुनिल शिंदे यांना संधी देण्यात आली आहे.

महाराष्ट्र विधान परिषदेच्या सहा जागांसाठी भारत निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम घोषित झाला आहे. त्यात धुळे-नंदुरबार, मुंबईतील दोन, कोल्हापूर, नागपूर, अकोला-बुलडाणा-वाशिम या जागांचा समावेश आहे.

महाराष्ट्र विधान परिषदेच्या या सहा जागांची मुदत येत्या मुदत 1 जानेवारी, 2022 रोजी पुर्ण होत आहे. त्यात सध्या  धुळे-नंदुरबार मध्ये अमरिशभाई पटेल, मुंबईत काँग्रेसचे भाई जगताप आणि शिवसेनेचे रामदास कदम, कोल्हापूरमध्ये काँग्रेसचे सतेज पाटील, नागपूरमध्ये भाजपचे गिरीश व्यास, अकोला-बुलडाणा-वाशिम येथे शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरिया हे आमदार आहेत.  या रिक्त होणा-या जागेकरिता भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आल्याने आचार संहिता लागू झाली आहे.

या निवडणूकीची अधिसूचना 16 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अखेरचा दिवस दि. 23 नोव्हेंबर (मंगळवार) 2021 आहे. दि. 24 नोव्हेंबर 2021 रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी केली जाणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस शुक्रवार, दि. 26 नोव्हेंबर,2021 असा आहे.

या मतदार संघांसाठी शुक्रवार, दिनांक 10 डिसेंबर, 2021 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदान होईल. मंगळवार, 14 डिसेंबर, 2021 रोजी मतमोजणी होणार असून गुरुवार, 16 डिसेंबर, 2021 पर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावयाची आहे, असे निवडणूक आयोगाने कळविले आहे.

भारत निवडणूक आयोगाने कोविड-19 संदर्भातील विस्तृत मार्गदर्शक तत्त्वे तसेच यासंदर्भात अलीकडेच दिनांक 28 सप्टेंबर 2021 रोजीच्या प्रसिध्दीपत्रकान्वये जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक राहील. या मार्गदर्शक सूचना https://eci.gov.in/candidate-political-parties/instructions-on-covid-१९/. संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. दरम्यान, सोलापूर आणि अहमदनगर या दोन ठिकाणची निवडणूक होणार आहे. या दोन्ही जागांची मुदतही जानेवारीतच संपत आहे. मात्र, ही निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

भाजपने कोल्हापूरमधून अमल महाडीक, धुळे-नंदुरबार मध्ये अमरिश पटेल, नागपूरमधून चंद्रशेखर बावनकुळे, अकोला-वाशीम मध्ये वसंत खंडेलवाल आणि मुंबईतून राजहंस धनंजय सिंह यांना उमेदवारी घोषित केली आहे. तर, शिवसेनेने मुंबईतून रामदास कदम यांच्या ऐवजी माजी आमदार सुनिल शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. तर, अकोला-बुलडाणा-वाशिम या जागेसाठी विद्यमान आमदार गोपीकिशन बाजोरिया यांना पुन्हा शिवसेनेने संधी दिली आहे.

लढत रंगणार
मुंबईत भाजपने राजहंस धनंजय सिंह यांना तर शिवसेनेने सुनिल शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. तर, अकोला-बुलडाणा-वाशिममध्ये गोपिकिशन बजोरिया यांचा सामना भाजपच्या वसंत खंडेलवाल यांच्याशी होणार आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

देशातील कोरोना रुग्णसंख्या, लसीकरण व पॅाझिटिव्हिटी दराची ही आहे स्थिती

Next Post

नाशिकच्या १७ वर्षाच्या वेदांत कुलकर्णी जागतिक परिषदेत डंका

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

crime1 1
क्राईम डायरी

रूम पार्टनर झोपी गेला…परप्रांतीय तरूणाने बॅगेतील रोकड काढून केला पोबारा

सप्टेंबर 18, 2025
G0yR538bcAA85YQ e1758203148768
राष्ट्रीय

आता या परिक्षेत उमेदवारांच्या चेहेरा प्रमाणीकरणासाठी AI चा वापर…

सप्टेंबर 18, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
राज्य

पुण्यात बेरोजगार युवकांच्या फसवणुकीचे प्रकार वाढले…कामगार आयुक्तांनी केले हे आवाहन

सप्टेंबर 18, 2025
crime1
क्राईम डायरी

घरातील साफ सफाई करणा-या दांम्पत्याने बंगला मालकाच्या साडेसहा लाखाच्या दागिण्यांवर मारला डल्ला

सप्टेंबर 18, 2025
court 1
महत्त्वाच्या बातम्या

हैदराबाद गॅझेटविरोधी याचिका हायकोर्टाने फेटाळली…मराठा समाजाला दिलासा

सप्टेंबर 18, 2025
accident 11
क्राईम डायरी

अज्ञात चारचाकीने दिलेल्या धडकेत ४८ वर्षीय महिला ठार…नाशिक येथील घटना

सप्टेंबर 18, 2025
crime114
क्राईम डायरी

मैत्रिणीशी लग्न केले म्हणून टोळक्याने तरूणाचे अपहरण करुन लुटले…त्र्यंबरोड भागातील घटना

सप्टेंबर 18, 2025
rohit pawar
संमिश्र वार्ता

रोम जळत आहे आणि निरो बासरी वाजवत आहे…रोहित पवार यांची मुख्यमंत्र्यावर टीका

सप्टेंबर 18, 2025
Next Post
IMG 20211119 WA0001 e1637394706829

नाशिकच्या १७ वर्षाच्या वेदांत कुलकर्णी जागतिक परिषदेत डंका

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011