इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – राज्य सरकारच्या आरोग्य विभागाचा धक्कादायक कारभार उजेडात आला आहे. जनजागृतीसाठीच्या कुटुंब नियोजन कीटमध्ये आशा सेविकांना चक्क रबराचे लिंग देण्यात आले आहे. हा सर्व प्रकार अजाणतेपणी झाला आहे की, जाणूनबुजून याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. मात्र, भाजपच्या महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी याप्रकरणी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. बुलढाणा येथे आशा सेविकांना अशा प्रकारचे कीट आणि त्यात रबराचे लिंग देण्यात आल्याचे वाघ यांनी म्हटले आहे. वाघ यांनी याप्रकरणी पोलिस महासंचालकांकडे तक्रार केली आहे. तसेच, आशा सेविकांच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य याद्वारे करण्यात आल्याने याप्रकरणी कठोर कारवाई केली जाईल का, असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. दरम्यान, या सर्व प्रकारामुळे राज्यभरात तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. तर, याप्रकरणी सखोल चौकशी करुन कठोर कारवाईचे आदेश अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिले आहेत.
https://twitter.com/ChitraKWagh/status/1505569703137525760?s=20&t=WodmDNthh4Ki06f3IME6Vg