माघी जया एकादशी
– पंडित दिनेश पंत
आज माघी अर्थात जया एकादशी आहे. आजच्या दिवसाला विष्णू पूजनास विशेष महत्त्व आहे. आज सर्वप्रथम स्नानानंतर देवपुजे प्रसंगी सर्व देवांना अष्टगंध लावून पूजा करावी. शुद्ध तुपाचा दिवा लावावा. तिजोरी मुख्य दरवाजा यावर स्वस्तिक चिन्ह काढावे. आजचा दिवस उपवास करावा त्यामध्ये फलाहार घ्यावा. आजच्या दिवसाला शिधा दान यास विशेष महत्त्व आहे. ज्योतिष शास्त्राप्रमाणे आज बुधादित्य महालक्ष्मी षष्ठ योग त्याचप्रमाणे लाभातील चंद्र गुरु यामुळे मुहूर्त साधला गेला आहे. आज सायंकाळी सूर्यास्तानंतर देवाला समोर कणिक हळदी चा शुद्ध तुपात दिवा लावावा. खिरीचा नैवेद्य दाखवावा. आरती नंतर उपवास सोडावा. दरम्यान दिवसभर ओम नमो भगवते वासुदेवाय हा जप सतत मनात चालू ठेवावा जमल्यास जपमाळ करावी. अथवा हा जप श्रवण करावा.