इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मुलाचा ताब्यात देण्याच्या प्रकरणावर सुनावणी करताना मद्रास उच्च न्यायालयाने लग्नाबाबत महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदवली आहेत. विवाहाचा अर्थ केवळ शारीरिक सुख मिळवणे नसून कुटुंबाला पुढे नेणे हा सुद्धा आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. मुले हा एकमेव आधार आहे ज्यातून कुटुंबाची साखळी पुढे सरकते. शिवाय कोणत्याही विवाहात जोडप्यांना एकत्र ठेवण्यासाठीही मुले महत्त्वाचा आधार असतात. या जोडप्यामधील संबंध संपुष्टात येऊ शकतात. पण त्यांचे मुलांशी आई आणि वडील असे नाते कायम आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती कृष्णन रामास्वामी म्हणाले की, कोणत्याही मुलासाठी त्याचे आई आणि वडील दोघेही महत्त्वाचे असतात, जरी त्यांच्यापैकी एकाचे दुसऱ्याशी लग्न झाले असेल. मुलाच्या ताब्याबाबत वकील दाम्पत्यामध्ये सुरू असलेल्या खटल्याच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले. न्यायालयाने अनेक आदेश देऊनही वकील पुरुषाने पत्नीला मुलाशी भेटू दिले नाही. त्यानंतर महिलेने न्यायालयात धाव घेतली आणि सांगितले की पतीने आई-वडील म्हणून तिचे अधिकार खोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे. असे करणे चुकीचे आहे आणि त्याचा हक्क हिरावून घेणार आहे.
यावर सुनावणी करताना न्यायमूर्ती रामास्वामी म्हणाले, ‘मुलाला त्याच्याच आई किंवा वडिलांच्या विरोधात उभे करणे चुकीचे आहे. हे एक प्रकारे त्याला स्वतःच्या विरोधात उभे करणे आहे. मुलाला थेट दोन्ही हातांची गरज असते म्हणजेच त्याच्यासाठी आई आणि वडील आवश्यक असतात. मुलांना त्यांच्या संपूर्ण आयुष्यासाठी आणि विशेषतः ते प्रौढ होईपर्यंत पालकांची गरज असते. इतकेच नाही तर, न्यायमूर्ती रामास्वामी म्हणाले की, जोपर्यंत त्याच्या जवळच्या आणि विश्वासू व्यक्तीने त्याला भडकावले नाही तोपर्यंत मुलामध्ये आई-वडिलांबद्दल द्वेषाची भावना असू शकत नाही. ताब्यात असलेल्या मुलाला इतर पालकांविरुद्ध भडकवण्याचा प्रयत्न करणे योग्य नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
Madras High court on Marriage Meaning Sex
Legal Husband Wife Child