इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – चहा हा सर्वांचा आवडीचा पेय तथा पदार्थ आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांना चहा आवडतो. परंतु अद्यापपर्यंत चहा प्यायल्याने मृत्यू पडल्याची घटना घडल्याचे ऐकवीत नाहीत, चहाचे दुष्परिणाम होतात, हे सर्वांनाच माहित आहे. परंतु थेट मृत्यू होणे ही घटना निश्चितच धक्कादायक म्हणावी लागेल. परंतु असे घडले एका लहानग्या बालकांनी चहा प्याल्याने त्याचा तात्काळ मृत्यू झाला. त्यामुळे कुटुंबीयांना नव्हे तर डॉक्टर आणि पोलिसांना देखील या घटनेवर आश्चर्य वाटत असून नेमके कशामुळे हा प्रकार घडला याची चौकशी सुरू आहे.
श्वास घेण्यास त्रास
याबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, मध्यप्रदेशच्या देवासमध्ये चहा प्यायल्याने एका दीड वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. चहा प्यायल्याने मुलाचा मृत्यू झाल्याचा दावा त्याच्या आई केला आहे. दीड वर्षाचा मुलगा आई चहा पित असताना चहासाठी हट्ट करू लागला. त्यामुळे आईने त्याला चहा दिला मुलाला चहा प्यायल्यानंतर श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. लहान मुलाचे वडील तुरुंगात असल्याने तो आपल्या आजोबांच्या घरी होता. चहा दिल्यानंतरच मुलाला अस्वस्थ वाटू लागले. प्रकृती बिघडल्याने त्यांनी त्याला इंदूरच्या नेहरू रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात येणार होते, मात्र त्यापुर्वीच या लहान मुलाचा मृत्यू झाला.
कारण कळू शकले नाही
नेहरू रुग्णालयाच्या डॉ. प्रीती मालपाणी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या लहान मुलाला हॉस्पिटलमध्ये आणले तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. आम्ही मृतावस्थेत या मुलाला होते. त्यामुळे आम्ही मृत्यूच्या कारणावर भाष्य करू शकत नाही. मात्र एवढ्या लहान मुलाला चहा दिलाच का? असा प्रश्न डॉक्टर व पोलिसांना पडला आहे. या बालकाचा मृत्यू खरेच चहा प्यायल्याने झाला की अन्य काही कारणामुळे झाला याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मात्र चहामुळे ते देखील मात्र चहा मध्ये देखील भेसळ असू शकते त्यामुळे किंवा श्वसन नलिकेत चहा अडकल्याने मृत्यू झाला असावा अशी आता चर्चा होत आहे मात्र अद्याप नेमके कारण कळू शकले नाही.
Madhya Pradesh Tea Drinking Small Child Death
Mother Claim Doctor Police Devas