इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या संकल्पनेतून विधानसभा मतदारसंघांमध्ये विकास यात्रा काढण्यात येत आहे. विकास यात्रेत संबंधित विधानसभा मतदारसंघातील आमदारांच्या उपस्थितीत मंत्री विविध कामांची उद्घाटने आणि पायाभरणी करत आहेत. या कार्यक्रमादरम्यान चित्रपटात असतो तसाच एक किस्सा घडला. आरोग्य राज्यमंत्री ब्रिजेंद्र सिंह यादव यांच्यासोबत एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. आणि त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
मंत्री ब्रिजेंद्र सिंह यादव कार्यक्रमाला पोहोचले. तेव्हा त्यांना अचानक खाज सुटू लागली. मंत्र्यांनी ही खाज थोडा वेळ सहन केली, पण ही खाज असह्य झाल्यावर मंत्री यादव यांनी अचानक स्टेजवर जोरात अंग खाजायला सुरूवात केली. त्यानंतर त्यांनी स्टेज सोडले. ते धावू लागले. त्यांनी अंगावरील कपडे काढून फेकले. त्यानंतर पाण्याने अंग धुतले. मंत्र्यांच्या खाज सुटण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
मध्य प्रदेश सरकारचे आरोग्य राज्यमंत्री ब्रिजेंद्र सिंह यादव विकास यात्रेत त्यांच्या मतदारसंघ मुंगवली येथे जात होते. बुधवारी संध्याकाळी उशिरा ते त्यांच्या विधानसभा मतदारसंघातील देवर्ची गावात पोहोचले. तेव्हा कोणीतरी खाचखुजलीची पावडर उडवली. त्यामुळे मंत्र्यांच्या हातासह शरीराच्या विविध भागात खाज सुटू लागली. तीव्रतेने खाज सुटू लागल्यावर मंत्र्यांनी स्टेज सोडले. त्यांनी कपडे काढले आणि अंग धुण्यासाठी पाणी मागितले. आजूबाजूच्या लोकांनी त्यांना तातडीने पाणी दिले.
कार्यक्रमादरम्यान मंत्री ब्रिजेंद्र सिंह यादव यांच्यासोबत काही कार्यकर्त्यांनी असे कृत्य केल्याचे सांगण्यात येत आहे. आता राज्याच्या मंत्र्यासोबत असे कृत्य कोण करत आहे, याची माहिती पोलीस आणि पक्षाचे लोक गोळा करत आहेत.
दरम्यान, जर तुम्ही खाचखुजलीच्या रोपाला स्पर्श केला किंवा शरीराच्या कोणत्याही भागाला आणि कपड्यांशी संपर्क आला तर त्यामुळे खाज सुटते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्या संपर्कात आल्यानंतर ती सतत वाढत जाते. आणि तीच वनस्पती मंत्र्यांच्या कपड्यांवर पावडर टाकण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे त्यांच्या संपूर्ण अंगाला खाज सुटली आणि त्यांना कार्यक्रम सोडून पळून जावे लागले.
बघा व्हायरल व्हिडिओ
https://twitter.com/KashifKakvi/status/1623563650522030080?s=20&t=ntrLRuzlhDJBUOGAHOAdUg
Madhya Pradesh Minister Suffering Skin Itching Video Viral