इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पूर्वीच्या काळी खेड्यातील असो की शहरातील नागरिक बँका नसल्याने घरातच पैसे आडके एखाद्या मडक्यात ठेवून ते जमिनीत पुरून ठेवत असत. परंतु कालांतराने त्या कुटुंबातील नागरिकांचा मृत्यू झाल्यावर तीन आणि ते गुप्तधन तसेच जमिनीच्या उदरात गडप होईल मात्र ते जुने घर पाडल्यावर तो खजिना कोणाला तरी सापडत असे. मध्य प्रदेशात देखील असाच एक प्रकार घडला.
एका पाडलेल्या घराच्या माती दगडांचा ढिगारा हटवताना मजुरांना तब्बल 86 सोन्याची नाणी मिळाली. इतकी सोन्याची नाणी सापडल्यानंतर त्यांनी ती आपसातच वाटून घेतली. पण नशिबाने एवढी लॉटरी लागूनही ती फार काळ मजुरांना टिकवता येऊ शकली नाही. कारण सगळ्या मजुरांना अटक करण्यात आली. ही अटक होण्यामागे एका मजुराची चूक सगळ्यांना भोवली. कारण आपसात वाटून घेतलेली नाणी एका मजुराने विकायचं ठरवलं. त्यापैकी एक नाणं विकलं गेलं. त्यानंतर याची माहिती पोलिसांना मिळाली. अखेर हे सगळंच प्रकरण उघडकीस आलं. ही नाणी साधीसुधी नसून पुरातत्व नाणी असल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला आहे.
मध्य प्रदेशच्या धार जिल्ह्यामध्ये एक जुनं घर पाडलं गेलं. घर पाडल्यानंतर या घराचा ढिगारा हटवण्याचं काम काही मजुरांना देण्यात आलं होतं. मजूर आपलं काम इमानेइतबारे करत होते. पण काम करताना अचानक त्यांना नाण्यासारखं काहीतरी आढळलं. ढिगाऱ्यात नाणी कुठून आली असा प्रश्न मजुरांना पडलं. मजुरांनी गुपचूप ढिगारा व्यवस्थित बाजूला गेला. ढिगारा हटवल्यानंतर मजुरांना सोन्याची 86 नाणी तिथं आढळून आलं. सगळ्याच मजुरांचे डोळे चमकले. आपल्याला जणू लॉटरीच लागल्याचा भास मजुरांना झाला. आता एवढी नाणी मिळाली आहेत, तर मग भांडण होऊ नये म्हणून मजुरांनी एक पर्याय शोधला. आपआपसात नाणी वाटून घेतली.
घर पाडल्यानंतर ढिगारा हटवण्याचं काम ज्याने दिलं होतं, त्याला याबाबत मजुरांनी काहीच सांगितलं नाही. ढिगारा हटवण्याचं काम संपल्यावर मजून निघून गेले. सुमारे 2600 चौरस फूट जागेत पाडकाम करताना मजुरांना हा खचिना हाती लागला होता. एका धातूच्या भांड्यात मजुरांना एक किलो वजनाची 86 सोन्याची नाणी आढळलेली होती. मात्र या आठ मजुरांपैकी एका मजुराने दारुच्या नशेत आपल्याकडे असलेलं एक नाणं 56 हजाराला विकल्याचं सांगितलं. त्यानंतर त्यानं आलेल्या पैशातून एक सेकंड हॅन्ड फोन घेतला आणि आपली दैनंदिन आर्थिक व्यवहार भागवू लागला. यातून पोलिसांना संशय आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि त्यानंतर हे सगळं प्रकरण उघडकीस आलं.
पोलिसांकडून आता या सगळ्यांची कसून चौकशी केली जातेय. मजुरांनी पळवलेल्या सोन्याच्या नाण्यांसह दुर्मिळ दागिनेही पोलिसांनी जप्त केलेत. या सगळ्याची किंमत 60 लाख ते एक कोटी रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे. दरम्यान, या घरमालकाच्या जागेत त्यांना हे घबाड सापडलं होतं, त्याने दिलेली माहितीची चकीत करणारीच होती. घरमालक शिवनारायण राठोड यांनी मजुरांना ढिगारा उपसण्याचं काम दिलं होतं. राठोड कुटुंबाच्या पिढ्या गेल्या 100 वर्षांपासून याच ठिकाणी राहत होत्या. पण त्यांना असा काही खजिना आपल्या घराच्या खाली आहे, याची कल्पनाच नव्हती, असं पोलिसांनी म्हटले आहे.
https://twitter.com/srdmk01/status/1564299277840822273?s=20&t=Coog0XwMLD4SBqR4mCV35Q
Madhya Pradesh Labor found Secrete Money Police