रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

४ महिन्यांनी स्वप्नात आला मुलगा… आईनेच दिली हत्येची कबुली… आपल्याच चिमुरड्याला असं संपवलं…

by India Darpan
सप्टेंबर 7, 2023 | 1:57 pm
in संमिश्र वार्ता
0
crime diary 2

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – एखाद्या महिलेने आपल्या मुलाला ठार करणे किंवा मुलाने मातेची हत्या करणे, या घटना आजच्या काळात जणू काही सर्रास झाल्या आहेत. त्यामुळे समाज कोणत्या स्तराला चालला आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये अशाच प्रकारची एक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

म्हणून घडला हा प्रकार
ग्वाल्हेरमध्ये एका महिलेने आईच्या नात्याला काळीमा फासला आहे. या निर्दयी मातेने स्वत:च्या मुलाला छतावरून ढकलून देत त्याची हत्या केली. कारण या महिलेचे शेजाऱ्यासोबत अनैतिक संबंध होते. विशेष म्हणजे ही महिला हेड कॉन्स्टेबलची पत्नी आहे. एका दुकानाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला सर्व जण एकत्र आले असता सर्वांची नजर चुकवत ते छतावर गेले होते. त्याठिकाणी दोघेही प्रेमाचे चाळे करत होते. तेव्हा तिचा ३ वर्षीय मुलगा तेथे आला. आता लहान मुलगा त्याच्या वडिलांना म्हणजे आपल्या नवऱ्याला सर्व काही सांगेल अशी भीती या महिलेला निर्माण झाली. त्यामुळे तिने आपल्याच तीन वर्षांच्या चिमुरड्याला दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकून दिले. छतावरून खाली पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. महिलेने याप्रकरणी कोणाला काहीही सांगितले नाही. त्यामुळे या गुन्ह्यातून ती बचावली होती.

अशी पत्करली शरणागती
मुलगा छतावरून खाली पडल्याने हा एक अपघात असल्याचे सर्वांना वाटले. मात्र खरा प्रकार त्या महिलेलाच माहित होता. आपण आपल्या लहान मुलाचा जीव घेतला. यामुळे ती अस्वस्थ होती. मनी दिसे ते स्वप्न वसे या म्हणीप्रमाणे या घटनेच्या ४ महिन्यानंतर महिलेला वाईट स्वप्ने पडू लागली. त्या भीतीदायक स्वप्नात तिला तिचा मृत मुलगा दिसू लागला. अनेक रात्री अशाच गेल्या. स्वप्नातून तिचा मृत मुलगा पाठलाग सोडत नव्हता. ‘तू मला का मारले?’ हा प्रश्न महिलेच्या मनात येत होता. अखेर महिलेने तिचा गुन्हा पतीसमोर कबुल केला. त्यामुळे त्याला धक्का बसला. त्यानंतर पतीने महिलेचं पूर्ण कथन व्हिडिओ रेकॉर्ड केले. त्यानंतर पत्नीने पोलिसांसमोर शरणागती पत्करली. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.

Madhya Pradesh Gwalior Crime Mother Murder Son
Small Child

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सरकारच्या निर्णयानंतर मनोज जरांगे-पाटलांनी केली ही मोठी घोषणा

Next Post

आदित्य एल१ने काढला पृथ्वीचा सेल्फी… इस्रोने जाहीर केला हा व्हिडिओ

India Darpan

Next Post
Capture 1

आदित्य एल१ने काढला पृथ्वीचा सेल्फी... इस्रोने जाहीर केला हा व्हिडिओ

ताज्या बातम्या

rain1

राज्यात पुढील काही दिवसात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता

जून 22, 2025
Untitled 74

महिलांच्या सशक्तीकरणाची नवी चळवळ…..‘बहिणाई मार्ट’च्या भूमिपूजनाने स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू

जून 22, 2025
CrestEH6T

भारतीय नौदलाच्या ताफ्यात ही युद्धनौका सामील होणार; रशियात होणार समारंभ

जून 22, 2025
Untitled 73

या जिल्ह्यासह पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट; राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती

जून 22, 2025
modi 111

इराणच्या राष्ट्रपतींना पंतप्रधान मोदी यांनी केला फोन….झाली ही चर्चा

जून 22, 2025
bjp11

ठाकरे गटाला मोठा धक्का….मुंबईत या दोन माजी नगरसेवकांनी केला भाजपात प्रवेश

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011