इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पती पत्नीचे नाते हे प्रेमाचे असते, पत्नी घराचा कारभार पाहत असते, तसेच आर्थिक नियोजन ही करते, त्यामुळे अनेक ठिकाणी पैशाचे व्यवहार पत्नीकडेच असतात, त्यामुळे पतीला पत्नीकडून पैसे मागून घ्यावे लागतात. एका मात्र शंभर रुपये मागितले म्हणून पत्नीने पतीवर पेट्रोल टाकून त्याला पेटवून दिले. याला कारण म्हणजे त्याला दारूचे व्यसन होते आणि दारूसाठी तो पैसे मागत असल्याने रागाच्या भरात तिने हे कृत्य केले, त्यामुळे गावात मोठी गर्दी जमा झाली आणि या घटनेची खूपच चर्चा रंगली.
थेट दुचाकीतील पेट्रोलच काढले
अनुपूर जिल्ह्यातील मनमारी गावात पती- पत्नीमध्ये वाद झाला. या भांडण तथा वादाची ठिणगी इतकी पेटली की, पत्नीने रागाच्या भरात त्याला पेटवून दिले, केवळ १०० रुपये मागितले म्हणून तिने दुचाकीतील पेट्रोल काढून ते अंगावर ओतले. त्यानंतर पेटवून दिले, असा आरोप तिचा पती अंगद प्रसाद चौधरी (वय ३२) याने केला असून तो यात गंभीररित्या भाजला आहे. घटनेनंतर तात्काळ त्याला नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.
दारुचे व्यसन
आता या इसमाला प्राथमिक उपचारानंतर त्याला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला. या घटनेबाबत संबंधित रुग्णालय प्रशासनाकडून माहिती मिळाली. जखमी तरूण रुग्णालयात दाखल आहे. त्याचा जबाब नोंदवला आहे, तिने दुचाकीतील पेट्रोल अंगावर ओतून पेटवून दिले, असा आरोप ३२ वर्षीय तरुणाने केला आहे. या आरोपांची सत्यता तपासून बघत आहोत. त्याच्या पत्नीचा जबाबही नोंदवून घेतला आहे, असे पोलिसांनी सांगितले. वाईट गोष्ट म्हणजे जखमी तरुणाला दारूचे व्यसन आहे. त्याने पत्नीकडे दारुसाठी पैसे मागितले. तिने पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर ही घटना घडली आहे.
Madhya Pradesh Bhopal Crime Husband Wife Dispute Fire Burn
Petrol ablaze