नवी दिल्ली: देशभरात रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असतांना बॅालिवूडमध्येही रक्षाबंधनाची धूम असते. हिंदी चित्रपटातील अभिनेते, अभिनेत्री यांच्या घरी सुध्दा हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. पण, त्यांच्या या सणांबद्दल सर्वसामान्यांना नेहमी औत्स्युक्य असते. ते सण कसे साजरा करतात हे जाणून घ्यायची सुध्दा इच्छा असते. त्यामुळे हिंदी चित्रपटातील अभिनेत्री माधुरी दिक्षीतने आपल्या रक्षाबंधनाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरुन शेअर केला आहे. तो चांगलाच व्हायरल झाला असून अनेकांच्या पसंतीस उतरला आहे. माधुरी दीक्षितने स्वतः तिच्या भावाला राखी बांधत असतांनाचा हा व्हिडिओ आहे..
https://twitter.com/MadhuriDixit/status/1429339890135695368?s=20