नाशिक – नेहरुनगरच्या आयएसपी केंद्रीय विद्यालयातील प्राथमिक शिक्षिका सौ. माधुरी विजय देवरे यांना राज्यस्तरीय कोविड योद्धा समाजरक्षक पुरस्कार -२०२१ हा ऑनलाईन पद्धतीने १० मेला सायंकाळी साडेसहा वाजता ऑनलाईन वितरित करण्यात आला. मुंबईच्या अखिल महाराष्ट्र पत्रकार व पत्रलेखन संघटनेच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष कृष्णाजी जगदाळे यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कोरोना काळात देखील सौ. देवरे यांनी संपूर्ण वर्षभर ऑनलाइन पद्धतीने असंख्य लहान मुलांना शिकवले, लहानपणापासून असलेला काव्य रचनेचा छंद जोपासत जवळजवळ शंभरच्या वर कविता केल्यात, आता सध्या त्या लहान मुलांसाठी विनामूल्य “विराट योग साधना वर्ग” घेत आहेत. या योग वर्गासाठी त्यांच्याबरोबर समाजातील विविध स्तरातील नावाजलेल्या संस्था व विविध स्तरातील शालेय तथा तरुण मुलं जोडली गेली आहेत. बरेचसे पालक सुद्धा मुलांबरोबर बसून पहाटेच्या वेळी त्यांच्यपाठोपाठ योगसाधना करतात. त्यांच्या ह्या महान कार्यासाठी त्यांना हा राज्यस्तरीय कोविड योद्धा समाजरक्षक महासन्मान पुरस्कार वर्ष २०२१-२०२२ साठी देण्यात आला. याबद्दल शाळेचे प्राचार्य बाळासाहेब लोंढे, उपप्राचार्या सौ. समता जांगडेकर, मुख्याध्यापक मनीष हावरगे, तसेच शाळेतील सर्व शिक्षक कर्मचारी वृंदानी त्यांचे कौतुक केले.