इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कोणत्याही समाजात सासूकडून सुनेचा छळ नेहमीच करण्यात येतो, असे म्हटले जाते. यासंदर्भातल्या घटना देखील आपण ऐकतो, वाचतो किंवा पाहतो परंतु आजच्या काळात काही ठिकाणी सुना देखील आपल्या सासूला त्रास देतात, असे दिसून येते. केवळ भारतातच नव्हे तर परदेशात देखील अशा घटना घडल्याचे बोलले जाते. बॉलिवूडमधील कलाकारांचे कौटुंबिक प्रश्न काही वेळा समोर येतात. एकेकाळची सौंदर्यवती आणि प्रसिद्ध अभिनेत्री मधुबाला यांच्या जीवनाची शोकांतिका झाल्याचे सांगण्यात येते. परंतु मधुबालाला जाऊन अनेक वर्षे लोटल्यानंतर आता तिच्या वृद्ध बहिणीला देखील वाईट दिवस आल्याचे दिसून येत आहे.
दिवंगत अभिनेत्री मधुबाला यांची थोरली बहीण कनीज बलसारा ( ९६ ) ही न्यूझीलंडहून एकटीच मुंबईत आली आहे. तिला कोणताही आधार किंवा पैसा नाही. तिची सून समिना हिने तिला फ्लाइटमध्ये बसवून हे गैरकृत्य केले आहे. कनीज बलसारा रात्रीच्या वेळी मुंबईत उतरली आहे. कनीजची मुलगी परवीज ही मुंबईतील वांद्रे भागात राहते. याविषयी माहिती देताना मधुबालाची भाची परवीजने सांगितले की, माझी वृद्ध आई कनीज तिच्या पती व नातेवाईकांसोबत न्यूझीलंडला गेली, कारण ती माझा भाऊ म्हणजे कनीजचा मुलगा फारूकवर प्रेम करत होती. ती मुलाशिवाय राहू शकत नव्हती. माझ्या भावालाही आई खूप आवडते. त्याने आई-वडिलांना न्यूझीलंडला नेऊन ठेवले. पण आमची वहिनी समिना ही आई-वडिलांना जीव लागत नसे. उलट त्रास देत असे. परवीझ पुढे म्हणाले की, समीना न्यूझीलंडमध्ये माझ्या आई-वडिलांसाठी जेवणही बनवले नाही. माझा भाऊ फारुख याला जवळच्या रेस्टॉरंटमधून आई आणि वडिलांसाठी जेवण आणावे लागले. आता आई भारतात आली असून मी आता आईला घरी आणून खायला दिले, आम्ही देवाचे आभार मानतो की, आई आता बरी आहे पण मोठ्यांशी गैरवर्तन करणे योग्य नाही.