शुक्रवार, ऑगस्ट 29, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार सुकुमार दामले यांना जाहीर

by Gautam Sancheti
जुलै 18, 2022 | 9:24 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20220718 WA0232 2

मनमाड – स्वातंत्र्यसैनिक कॉम्रेड माधवराव गायकवाड बहुउद्देशिय संस्थेतर्फे कॉम्रेड माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार कॉम्रेड सुकुमार दामले (दिल्ली) यांना आज कॅा. गायकवाड यांच्या चौथ्या जयंती दिनी जाहीर करण्यात आला. रोख रक्कम ३१ हजार रुपये स्मृती चिन्ह, गौरवपत्र ,शाल देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्ष अॅड. साधना गायकवाड, सचिव राजू देसले यांनी दिली.

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जेष्ठ नेते, स्वातंत्र्य सेनानी, संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचे नेते, खंडकरी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणारे माजी आमदार कॉम्रेड माधवराव गायकवाड यांचे १२ नोव्हेंबर २०१८ रोजी वयाच्या ९३ व्या निधन झाले. कॉम्रेड माधवराव गायकवाड यांचे कार्य शेतकरी, स्वातंत्र्य चळवळीत, खंडकरी शेतकरी प्रदिर्घ लढ्यातून जमीन मिळवून दिली आहे. सहकार क्षेत्रात हि छत्रपती नाशिक जिल्ह्या नागरी सहकारी पतसंस्थाचे संस्थापक अध्यक्ष होते २५ वर्ष पूर्वी स्थापन केलेल्या पथसंस्थेचे आठ शाखा कार्यरत आहेत. हौसिग सोसाईटी उभ्या केल्या आहेत. त्यातून अनेकांना घरे मिळालेत आहेत, नांदगाव विधानसभेचे आमदार, सहा वर्ष विधांपरिषदेचे विरोधी पक्षनेते, भाकपचे १२ वर्ष राज्य सरचिटणीस, किसान सभेचे १५ वर्ष अध्यक्षपद भूषविले. आयटक संलग्न नगरपालिका कर्मचारी संघटना, रेल्वे युनियन, आदी चळवळीत ७५ वर्ष योगदान दिले आहे. कॉम्रेड माधवराव गायकवाड(बाबूजी) यांचा विचाराचा वारसा व कार्य नेण्यासाठी स्वातंत्र्य सैनिक कॉम्रेड माधवराव गायकवाड बहुउद्देशीय संस्था स्थापन करण्यात आली आहे. संस्थेच्या वतीने हा पुरस्कार दरवर्षी दिला जात आहेत.

राजकीय व चळवळीतील परिचय – सुकुमार वासुदेव दामले
जन्म २ नोव्हेंबर १९४८, हैदराबादला आजोळी झाला.
शिक्षण : प्राथमिक शिक्षण जळगाव जिल्ह्यातील अमळनेरला म्युनिसिपल शाळेत, त्यानंतर प्रताप हायस्कूल पाचवीपर्यंत, बुलढाण्याला एडेड हायस्कूल सहावी, सातवी परत प्रताप हायस्कूल, अमळनेर. त्यानंतर आठवी, नववी, दहावी सांगली टेक्निकल स्कूल, त्यानंतर मॅट्रिक मॉडर्न हायस्कूल,पुणे, पुढे प्री-युनिव्हर्सिटी, जानकीदेवी बजाज कॉलेज, वर्धा. त्यानंतर आय.आय.टी., कानपूर १९६५ ते १९७० बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी.
नोकरी :भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर, मुंबई त्यानंतर ही नोकरी सोडली आणि मर्चंट नेव्ही मध्ये माझगाव डॉक मुंबईमध्ये एक वर्ष ट्रेनिंग त्यानंतर मरीन इंजिनिअर म्हणून जून ७५ ते फेब्रुवारी ७७ पर्यंत काम केलं. त्यानंतर ही नोकरी सोडून दिली आणि १९७७ पासून आयटक या संघटनेमध्ये अंधेरी ट्रेड युनियन सेंटरमध्ये पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम करू लागले. त्यानंतर मुंबईतील बऱ्याच युनियन्सशी संबंध आला. आयटक(महाराष्ट्र)चा जनरल सेक्रेटरी १९९५ साली झाले. २०१५ साली अध्यक्ष आणि २०१७ पासून नॅशनल सेक्रेटरी म्हणून आयटक मुख्यालयात दिल्लीला कार्यरत आहेत. भविष्य निर्वाह निधी च्या सि बी टी चे सदस्य आयटक चे प्रतिनिधी आहेत. अंधेरी ट्रेंड युनियन सेंटरच्या माध्यमातून अनेक कामगारना कायम केले आहे. कामगार ना स्वस्तात घर मिळावे. यासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहेत. असंघटित कामगार ना न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्यभर काम करत आहेत. घरकामगार मोलकरीण संघटना मुंबई येथे उभारण्यात महत्त्वाचे योगदान दिले आहे. रेशन प्रश्न, वर काम केले आहे. सध्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी संघटना( आयटक) चे अध्यक्ष आहेत. आयटक नेतेकॉम्रेड ए. बी. वर्धन, कॉम्रेड गुरुदास दासगुप्ता, कॉम्रेड गंगाधर चिटणीस, कॉम्रेड धुमे, कॉम्रेड गोविंद पानसरे, कॉम्रेड माधवराव गायकवाड, आदींच्या नेतृत्व खाली काम केले आहे. आज ही आयटक राष्ट्रीय महासचिव कॉम्रेड अमर जित कौर, भाकप नेते डॉ भालचंद्र कांगो सहकाऱ्यांसोबत कार्यरत आहेत. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदस्य म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. अश्या लढाऊ नेत्यास, श्रमिकांच्या चळवळीसाठी आयुष्य वेचणाऱ्या समतेचे राज्य प्रस्तपित व्हावे यासाठी कार्यरत आयटक राष्ट्रीय नेते कॉम्रेड सुकुमार दामले वय ७५ व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या यांना कॉम्रेड माधवराव गायकवाड जीवनगौरव स्मृती पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मान्यवरच्या उपस्थीत वितरण करण्यात येणार असल्याची माहिती स्वातंत्र्यसैनिक कॉम्रेड माधवराव गायकवाड बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा अॅड. साधना गायकवाड, सचिव कॉम्रेड राजू देसले, विश्वस्त भास्कर शिंदे, कुसुमताई गायकवाड, रिकब जैन, सुभाष बेदमुथा, छबूशेठ शिरसाठ, मिखील स्वर्ग, व्ही डी धनवटे,कॉम्रेड दत्तू तुपे यांनी दिली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इंडिया दर्पण विशेष लेखमाला – खेळाच्या मैदानातून – बॅडमिंटन स्टार पी व्ही सिंधू

Next Post

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – १९ जुलै २०२२

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

manoj jarange
महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत जरांगे पाटील आंदोलनाला बसताच सरकारचा मोठा निर्णय…सुरु आहे या घडामोडी

ऑगस्ट 29, 2025
rohit pawar
महत्त्वाच्या बातम्या

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खाऊगल्ल्या बंद ठेवण्याचे आदेश, कोणत्याही सुविधा नाही…रोहित पवार यांचा गंभीर आरोप

ऑगस्ट 29, 2025
IMG 20250828 WA0508 e1756433976745
इतर

चेन्नई क्रिकेट दौऱ्यासाठी नाशिकचा साहिल पारख महाराष्ट्राचा कर्णधार…समकित सुराणा देखील संघात

ऑगस्ट 29, 2025
amol khatal
महत्त्वाच्या बातम्या

संगमनेरमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला…राजकीय वातावरण तापले

ऑगस्ट 29, 2025
Shirdi Sai baba e1727984889927
संमिश्र वार्ता

साईबाबा संस्थानच्या मोफत पार्किंग सुविधेमुळे शिर्डीतील वाहतूक सुरळीत….

ऑगस्ट 29, 2025
manoj jarange
महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगे पाटील मुंबईत दाखल… अनेक मार्गावर वाहतुकीत बदल

ऑगस्ट 29, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींना शुभ समाचार मिळेल, जाणून घ्या, शुक्रवार, २९ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 29, 2025
kapus
संमिश्र वार्ता

केंद्र सरकारने कापसावरील आयात शुल्क माफीला दिली या तारखेपर्यंत मुदतवाढ

ऑगस्ट 28, 2025
Next Post
Happy birthday

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस - १९ जुलै २०२२

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011