नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – काँग्रेस पार्टीचे नेते पवन खेडा यांनी पत्रकार परिषद घेत. सेबीच्या चेअरपर्सन माधवी पुरी बुच यांच्यावर आणखी एक गंभीर आरोप केला आहे. ज्या कंपनीला बुच यांनी आपली मालमत्ता भाड्याने दिली. त्याच कंपनीच्या संबंधित तक्रारी SEBI सतत हाताळत आहे.
खेडा यांनी सांगितले की, माधबी पुरी बुच २०१८ मध्ये SEBI चे पूर्णवेळ सदस्य बनल्या होत्या. आता पूर्णवेळ सभासद झाल्यानंतर त्यांनी त्यांची एक मालमत्ता भाड्याने दिली. २०१८-१९ या आर्थिक वर्षात त्यांना ७ लाख रुपये भाडे मिळाले. २०१९-२० मध्ये त्यांना त्याच मालमत्तेसाठी ३६ लाख रुपये भाडे मिळाले होते, जे या वर्षी वाढून ४६ लाख रुपये झाले. माधबी पुरी बुच यांनी ज्या कंपनीला तिची मालमत्ता दिली तिचे नाव कॅरोल इन्फो सर्व्हिसेस लिमिटेड आहे, जी वोक्हार्ट कंपनीचा एक भाग आहे. वोक्हार्ट ही तीच कंपनी आहे, जिच्याशी संबंधित तक्रारी SEBI सतत हाताळत आहे.
या अगोदरही केला होता हा आरोप
या अगोदर खेडा यांनी बुच यांनी एकाच वेळी तीन ठिकाणाहून पगार घेत असल्याचा आरोप केला होता. हा आरोप करतांना त्यांनी सांगितले होते की, देशात बुद्धिबळाचा खेळ सुरू आहे. याच बुद्धिबळ खेळाच्या एका तुकड्याबद्दल आम्ही सांगणार आहोत आणि ते नाव आहे: माधबी पुरी बुच. माधबी पुरी बुच ५ एप्रिल २०१७ ते ४ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत सेबीमध्ये पूर्णवेळ सदस्य होत्या. त्यानंतर त्या ३ मार्च २०२२ रोजी माधबी पुरी बुच या सेबीच्या अध्यक्षा झाल्या. सेबीच्या अध्यक्षांची नियुक्ती करणाऱ्या मंत्रिमंडळात पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांचा समावेश आहे.
माधबी पुरी बुच, SEBI चे पूर्णवेळ सदस्य असल्याने, ICICI बँकेकडून नियमित उत्पन्न घेत होत्या. जे १६.८० कोटी रुपये होते. त्या ICICI बँकेकडून ICICI प्रुडेंशियल, ESOP आणि ESOP चे TDS देखील त्यांना उत्पन्न मिळत होते. तर आम्हाला जाणून घ्यायचे आहे की, सेबीचे पूर्णवेळ सदस्य असूनही तुम्ही आयसीआयसीआयकडून तुमचा पगार का घेत होता? हे SEBI च्या कलम ५४ चे थेट उल्लंघन आहे. त्यामुळे माधवी पुरी बुच यांना थोडीही लाज वाटत असेल तर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. या आरोपानंतर ICICI बँकेनेही खुलासा केला होता.