मुंबई – लठ्ठपणा हा केवळ महिलांसाठीच नव्हे तर पुरुषांसाठीही एक गंभीर प्रश्न होऊन बसला आहे. मॉर्निंग वॉक, साययकलिंग यासारखे अनेक उपाय पुरुष मंडळीही करतात. मात्र लठ्ठपणा घालविण्यासाठी किंवा वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी उत्तम उपाय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. दररोज सकाळी उठल्यावर मध आणि लिंबू पाणी प्यायला हवे. मध आणि लिंबू पाणी मॉर्निंग डिटॉक्स ड्रिंक्सप्रमाणे काम करतात आणि वेगाने वजन कमी करण्यास मदत करतात. अश्याच काही घरगुती उपायांमधून वजन कमी करणे शक्य आहे. अवघ्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात वजन करण्यासाठी तुम्ही हे उपाय करू शकता. लठ्ठपणा नियंत्रीत ठेवण्यासाठी मध वजन कमी करतानाच लिपिड मेटाबॉलिजमही नियंत्रीत करते. एका संशोधनात असेही सिद्ध झाले आहे की मधासोबत दालचिनी घेतल्याने फॅट्स कमी करण्यासही मदत होते.
पहिला उपाय
१ कप पाणी, १ दालचिनी स्टिक आणि १ मोठा चमचा मध घ्या. एका भांड्यात पाणी उकळून घ्या. एका कपात दालचिनी स्टिक टाका आणि ते उकळत्या पाण्यात सोडून द्या. जवळपास ५ ते १० मिनीटे पाणी तसेच राहू द्या. दालचिनीची स्टिक काढून पाण्यात सहद टाका आणि हे मिश्रण कोमट झाल्यावर पिऊन घ्या.