सोमवार, ऑक्टोबर 13, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

या कंपनीने ७० देशांमध्ये ६७५,००० पेक्षा जास्त मेड-इन-इंडिया कार निर्यात केल्या…अव्वल निर्यातक म्हणून मान्यता

एप्रिल 3, 2025 | 7:17 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
Skoda Auto Volkswagen India has exported over 675000 made in India cars to about 40 70 countries till date

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– स्कोडा ऑटो फॉक्सवॅगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एसएव्हीडब्ल्यूआयपीएल)ला मुंबई बंदर प्राधिकरणाने ‘अव्वल निर्यातक २०२३-२०२४’ म्हणून मान्यता दिली आहे. या समूहाने आजवर ६७५,००० पेक्षा जास्त गाड्या निर्यात केल्या आहेत आणि इंजिनियरिंग आणि उत्पादन उत्कृष्टतेबाबतची आपली वचनबद्धता मजबूत केली आहे. २०२३ मध्ये या समूहाने विक्रमी ३८% वार्षिक वृद्धी नोंदवली होती आणि त्यात निर्यातीचे प्रमाण एकूण उत्पादनाच्या ३०% इतके होते. पाठोपाठ २०२४ मध्ये २०% वार्षिक वृद्धी झाली असून स्थानिक पातळीवर उत्पादित वाहनांमध्ये निर्यातीचा वाटा ४०% होता. भारत सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ व्हिजनशी सुसंगत राहून एसएव्हीडब्ल्यूआयपीएलने भारताला एक महत्त्वाचा ऑटोमोटिव्ह निर्यातक केंद्र बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

२०२३-२४ मध्ये एसएव्हीडब्ल्यूआयपीएलने एशिया, आफ्रिका आणि उत्तर अमेरिकेतील २६ पेक्षा जास्त देशांमध्ये स्थानिक स्तरावर निर्मित ४३,००० पेक्षा जास्त कार्स निर्यात केल्या. फॉक्सवॅगन व्हेंटो आणि पोलो या प्रसिद्ध मॉडेल्सपासून ते फॉक्सवॅगन व्हर्टस, फॉक्सवॅगन टाईगुन आणि स्कोडा कुशॅक या नव्या काळाच्या मॉडेल्सपर्यंत एसएव्हीडब्ल्यूआयपीएलच्या मेड इन इंडिया कार्स आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवत आहेत, ज्यामुळे त्यांची जागतिक उपस्थिती मजबूत होत आहे आणि या समूहाच्या जागतिक धोरणात भारताचे महत्त्व देखील वाढत आहे.

स्कोडा ऑटो फॉक्सवॅगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे मॅनिजिंग डायरेक्टर आणि सीईओ पियुष अरोरा या सिद्धीविषयी टिप्पणी करताना म्हणाले, “हा पुरस्कार प्राप्त करताना आम्ही गौरव अनुभवत आहोत. हा पुरस्कार गुणवत्ता आणि इनोव्हेशनप्रती आमच्या अढळ वचनबद्धतेची आणि भारतात डिझाईन करून उत्पादन केलेल्या कार्सच्या जगातील स्तरावरील वाढत्या उपस्थितीची साक्ष देतो. गेली अनेक वर्षे आम्ही एक मुख्य निर्यात केंद्र म्हणून आमची क्षमता दाखवली आहे. आणि जागतिक ऑटोमोटिव्ह उद्योगात भारताची भूमिका सशक्त करण्याबाबत आम्ही आजही समर्पित आहोत. बंदर प्राधिकरण, आमच्या निष्ठावान टीम्स, भागीदार आणि भाग धारक यांच्याविषयी आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो. कारण या सगळ्यांच्या सहयोगानेच हे यश आम्ही प्राप्त करू शकलो आहोत. वर्तमान २०२५ या वर्षात आम्ही निर्यातीची कामगिरी अशीच चालू ठेवून निर्यातीच्या आणखी संधींचा देखील शोध घेत राहू.”

आपल्या विस्तारित निर्यात धोरणाचा एक भाग म्हणून ही कंपनी आपल्या पुण्यातील पार्ट्स एक्स्पीडिशन सेंटरमधून व्हिएतनामला गाडीचे भाग देखील निर्यात करत आहे, ज्यामुळे त्या प्रांतात स्थानिक वाहन असेंबली करण्यास मदत होऊ शकते. ही धोरणात्मक चाल भारताच्या उत्पादन क्षमतेचा आणि भौगोलिक अनुरूपतेचा लाभ घेऊन जागतिक स्तरावर भारताच्या ऑटोमोटिव्ह क्षेत्राच्या विकासात योगदान देते.

देशांतर्गत ईकोसिस्टम विकसित करण्यावर, स्थानिक प्रतिभेस वाव देण्यावर आणि देशात चालणारी व जगभरात वाखाणली जाणारी जागतिक दर्जाची, उच्च गुणवत्तेची वाहने विकसित करण्यावर स्कोडा ऑटो फॉक्सवॅगन इंडियाचे लक्ष नेहमीच केंद्रित असते. सदर मैलाचा दगड पार करताना हा समूह ‘मेड इन इंडिया, फॉर इंडिया अँड द वर्ल्ड’ प्रती असलेल्या आपल्या वचनबद्धतेची पुष्टी करत आहे आणि भारतीय उत्पादनातील उत्कृष्टता जागतिक मंचावर घेऊन जाण्याचे काम निष्ठेने करत आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक जिल्हा रुग्णालयात सेफटी स्वीच ट्रीप, वीजेच्या तारांमधुन ठिणग्या…नवजात बालकांना सुरक्षित ठिकाणी केले स्थलांतरीत

Next Post

आता सर्व भौतिक सुविधांसह शाळांचे ‘जियो टॅगिंग’….मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

महत्त्वाच्या बातम्या

हुश्श… नाशिक शहराने घेतला मोकळा श्वास… खडबडून जागे झालेल्या महापालिकेने केली एवढी कारवाई…

ऑक्टोबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा आठवड्याचा पहिला दिवस… जाणून घ्या, सोमवार, १३ ऑक्टोबरचे राशिभविष्य….

ऑक्टोबर 13, 2025
rain1
मुख्य बातमी

अरे देवा… राज्यात या तारखेपासून पुन्हा वादळी पावसाचा अंदाज…

ऑक्टोबर 13, 2025
rainfall alert e1681311076829
महत्त्वाच्या बातम्या

मान्सून अखेर परतला का? की पुन्हा पाऊस बरसणार? रब्बीच्या हंगामावर काय परिणाम होणार? बघा, हवामानतज्ज्ञ काय म्हणताय….

ऑक्टोबर 12, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

आपत्तीग्रस्त तालुक्यांसाठी विशेष मदत पॅकेज, सवलती लागू… असा आहे शासन निर्णय…

ऑक्टोबर 12, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा रविवारचा सुटीचा दिवस… जाणून घ्या १२ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 12, 2025
प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
Next Post
farande .jpg 1 e1743415026482

आता सर्व भौतिक सुविधांसह शाळांचे 'जियो टॅगिंग'….मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011