नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रिकल्चरतर्फे शासकीय योजना आणि विविध व्यवसाय संधी याविषयावर शनिवार, दि. २० सप्टेंबर २०२५ दुपारी ३.३० वा. ४९, ५ वा. मजला, बिझनेस बे, श्रीहरी कुटे मार्ग, मुंबईनाका, नाशिक येथे सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. सेमिनारमध्ये बी.आई.एस. इंडिया सदस्य, महाराष्ट्र चेंबर स्टार्टअप समिती अध्यक्ष, स्टार्टअप इंडिया मेन्टर मार्गदर्शक तज्ञ सनदी अभियंता श्रीकांत पाटील हे स्टार्टअप्स, MSME योजना, अनुदान व कर्ज माहिती, उद्योग वाढीसाठी चित्रफितीद्वारे सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत.
उद्योजक, व्यापारी, नवउद्योजक, उद्योग करू इच्छिणाऱ्या युवक-युवतींनी सेमिनारचा लाभ घ्यावा. नावनोंदणीसाठी संपर्क – अविनाश पाठक, सहाय्यक सचिव, ७०२०२२६६२८२, ०२५३- २५७७७०४, [email protected] करावा असे आवाहन अध्यक्ष ललित गांधी, उपाध्यक्ष संजय सोनवणे, शाखा चेअरमन अंजु सिंघल, को-चेअरमन भावेश मानेक, संजय राठी व कार्यकारीणी समिती सदस्यांनी केले आहे.