इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – गुजरातच्या नवसारी जिल्ह्यात आज पहाटे भीषण अपघात झाला आहे. लक्झरी बस चालवित असतानाच ड्रायव्हरला अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे बस अनियंत्रित झाली. त्यामुळे हा भीषण अपघात घडला. या अपघातात ९ ज ठार झाले असून १५ जण जखमी झाले आहेत. यातील अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वर वेस्मा गावाजवळ हा अपघात घडला आहे. बस चालकाला चालत्या बसमध्येच हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ही बस थेट कारला धडकली. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांसह मोठा ताफा घटनास्थळी आला. स्थानिक नागरिकांनीही मदतकार्यात सहभाग घेतला. जखमींना तातडीने बस बाहेर काढण्यात आले. मृतांनाही बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. रुग्णवाहिकांद्वारे जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. या अपघातामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली. हळूहळू ही वाहतूक सुरळीत झाली.
नवसारीचे पोलिस अधीक्षक (एसपी) हृषिकेश उपाध्याय यांनी सांगितले की, बस वलसाडच्या दिशेने जात असताना वेस्मा गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला, तर एसयूव्ही कार विरुद्ध दिशेने येत होती. गुजरातचे नवसारी पोलिस उपाधिक्षक व्ही एन पटेल म्हणाले की, नवसारीतील अहमदाबाद-मुंबई महामार्गावर बस-कारच्या धडकेत ९ जणांचा मृत्यू झाला. अनेक जण जखमी झाले आहेत. एका गंभीर जखमीला सूरत येथे रेफर करण्यात आले आहे.
मृतांच्या नातेवाईकांना २ लाखांची मदत
गुजरातमधील नवसारी येथे झालेल्या रस्ते अपघातावर शोक व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘नवसारी येथील रस्ता अपघातात लोकांच्या मृत्यूने मी दुखावलो आहे. मी शोकाकुल कुटुंबांसोबत आहे. मला आशा आहे की जखमी लवकर बरे होतील. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना पंतप्रधान मदत निधीतर्फे २ लाख रुपये तर जखमींना ० हजार रुपये एक्स-ग्रेशिया म्हणून दिले जातील.
गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट करून या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. अमित शाह म्हणाले की, ‘गुजरातच्या नवसारीतील रस्ता अपघात हृदय पिळवटून टाकणारा आहे. या घटनेत ज्यांनी आपले कुटुंब गमावले आहे त्यांच्याबद्दल माझ्या संवेदना. स्थानिक प्रशासन जखमींना तत्काळ उपचार देत आहे, मी त्यांच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो.
https://twitter.com/DDNewsHindi/status/1609039684176609281?s=20&t=ZQc2RiMzc3GRTru5OG4rnQ
Luxury Bus and Car Major Accident 9 Death 15 Injured
Gujrat Navsari Road