पणजी (गोवा) – दरवर्षी तुळशी विवाह सोहळा संपन्न झाला की, लग्न मुहूर्त सुरु होतात आणि धुमधडाक्यात लग्न समारंभ पार पडतात. लग्नाचा हंगाम कार्तिकी एकादशीपासून सुरू होतो. त्यासाठी बाजारपेठेत उलाढाल सुरू झाली आहे. लग्नकार्य सुरू झाल्याने त्यासाठी वधूवरांकडचे नातेवाईकांनी पालक भरपूर खरेदी करत आहेत. त्याच बरोबर वधु – वर वेडिंग डेस्टिनेशन निवडण्यात व्यस्त आहेत. लग्नाचा सोहळा संस्मरणीय बनवायचा असेल, तर गोव्यातील ही लक्झरी हॉटेल्स योग्य आहेत. हॉटेल मॅनेजमेंट तज्ज्ञांच्या मते, गोव्यातील काही हॉटेल्स विवाहसोहळ्यासाठी योग्य ठिकाण आहेत. चला, जाणून घेऊ या हॉटेल्सबद्दल..
1) वेस्टिन गोवा
वेस्टिन हे रॉयल वेडिंगसाठी ओळखले जाते. या हॉटेलमध्ये एकावेळी 400 हून अधिक पाहूणे उपस्थित राहू शकतात. यासाठी वेस्टिन गोवाची गणना टॉप वेडिंग डेस्टिनेशन्समध्ये केली जाते. या हॉटेलमध्ये सर्व सुविधा उपलब्ध आहेत. वेस्टिन येथे आपण लग्नाचा रात्रीचा सोहळा संस्मरणीय बनवू शकता.
2) ग्रँड हयात गोवा :
या सुंदर शहरांमध्ये अनेक जण मित्र आणि प्रियजनांसोबत ख्रिसमस साजरा करतात, हयात हॉटेलची गणना अव्वल हॉटेल्समध्ये केली जाते. हे हॉटेल त्याच्या सौंदर्य आणि सुविधांसाठी लोकप्रिय आहे. हॉटेल हयात हे लग्नासाठी तसेच खाण्यापिण्यासाठी योग्य ठिकाण आहे. जर कोणाला बीच वेडिंगचा आनंद घ्यायचा असेल तर आपण हॉटेल हयात निवडू शकता.
3) लीला गोवा :
अरबी समुद्राच्या काठावर लग्न सोहळा करण्याचा विचार करत असाल तर लीला गोवा हॉटेल हा एक चांगला पर्याय आहे. हे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक गोव्याला भेट देतात. त्यातील काही लीला गोवाला ही भेट देतात. हे हॉटेल त्याच्या सौंदर्यासाठीही ओळखले जाते.
4) गोवा मॅरियट रिसॉर्ट :
स्थानिक नागरिकांच्या मते गोव्यात लग्नासाठी अनेक सुंदर हॉटेल्स आहेत. यामध्ये गोवा मॅरियटची गणना पाहिल्या किंवा अव्वल क्रमांकावर आहे. अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज, गोवा मॅरियट रिसॉर्ट आणि स्पा हे लग्नासाठी सर्वोत्तम ठिकाण आहे. जर आपल्याला लग्नाची रात्र संस्मरणीय बनवायची असेल तर तुम्ही गोवा मॅरियट निवडू शकता.