इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारतीय रेल्वे ही आपल्या देशाची रक्तवाहिनी समजली जाते. हजारो रेल्वे गाड्यांमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. या रेल्वे गाड्यांमध्ये पॅसेंजर, एक्सप्रेस, सुपर एक्सप्रेस आणि लांब पल्ल्यांच्या गाड्यांचा समावेश असतो. काही रेल्वे गाड्या अत्यंत चकाचक असल्या तरी अद्यापही अनेक गाड्यांमध्ये सोयी सुविधांचा अभाव असतो. तसेच रेल्वे स्टेशन देखील काही प्रमाणात स्वच्छ आणि चांगले असले तरी अद्यापही अनेक ठिकाणी प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागतो.
एखादी रेल्वे जर पंचतारांकीत हॉटेल सारखी असेल तर याची आपण कल्पना देखील करू शकत नाही परंतु हे शक्य आहे अर्थात भारतात नव्हे तर परदेशातच शक्य आहे.या ट्रेन प्रवासादरम्यान पंचतारांकित हॉटेल्ससारख्या सुविधा उपलब्ध असतील तर कोणाला प्रवास करायला आवडत नाही? असाच अनुभव जगातील सर्वात लक्झरी ट्रेन व्हेनिस-सिम्पलॉन ओरिएंट एक्सप्रेसमध्ये मिळतो.
सन 1920-30 च्या दशकात ओरिएंट एक्स्प्रेस खूप प्रसिद्ध होती, कारण त्यावेळी अशा गाड्यांचे युग आले नव्हते. त्यात प्रवास करणे हे त्याकाळी प्रत्येक माणसाचे स्वप्न होते. मात्र, हे स्वप्न आजही कायम आहे. प्रवासादरम्यान, प्रवाशांना या लोकप्रिय लक्झरी केबिनमध्ये शॅम्पेन मिळते. बारमध्ये क्रिस्टल ग्लासेसमध्ये पेय दिले जाते. आलिशान लेदरच्या खुर्च्यांवर बसून प्रवासी उत्तम जेवणाचा आनंद घेऊ शकतात.यामध्ये लोकांना झोपण्यासाठी खाजगी स्लीपिंग क्वार्टर आहेत, जेथे बेडवर रेशमी चादर घातली जाते.
https://twitter.com/NouveauDeco/status/1543488557402263553?s=20&t=UthBXjJ0ImbBVe1iJAcQKA
या प्रवासादरम्यान, मखमली पलंगावर इतकी शानदार झोप येते की, प्रवासी एका शहरात झोपलेले असतात, तर ते दुसऱ्या शहरात जागे होतात. ओरिएंट एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांना पंचतारांकित हॉटेलचा अनुभव येतो. यात बार, थीम रेस्टॉरंट आणि विविध प्रकारच्या मनोरंजनाच्या सुविधा आहेत. ट्रेनने लोकांनी लंडन ते इटलीतील व्हेनिसपर्यंतच्या प्रवास केला आहे. या ट्रेनचा उद्देश ब्रिटनला युरोपियन रेल्वे नेटवर्कशी जोडण्याचा होता.
जगातील सर्वात महागड्या ट्रेनपैकी एक असून ही लांब पल्ल्याच्या ट्रेन 1883 मध्ये बांधली गेली होती आणि 1920 ते 1930 च्या दशकात ती खूप लोकप्रिय होती. या ट्रेनचे आतील भाग उत्तम शैलीचे आहे. ओरिएंट एक्स्प्रेस सुरू करण्याचा उद्देश ब्रिटनला युरोपियन रेल्वे नेटवर्कशी जोडणे हा होता. मूळ ओरिएंट एक्सप्रेस 1977 मध्ये बंद करण्यात आली होती. मात्र, आता ही ट्रेन पुन्हा परतण्यासाठी सज्ज झाली आहे. 2024 मध्ये पॅरिस ऑलिम्पिकच्या वेळी नॉस्टॅल्जी-इस्तंबूल-ओरिएंट-एक्सप्रेस म्हणून ते पुन्हा सुरू केली जाईल, असे कळते.
https://twitter.com/svtcivni/status/1475858614283911171?s=20&t=UthBXjJ0ImbBVe1iJAcQKA
Luxurious Venice Simplon Orient Express Features