ऑपेल एक लक्झरिअस रत्न म्हणून वापरले जाते. हे रत्न अतिशय नयनमनोहर असते. सिलिकेट नावाच्या खनिजापासून हे बनते. मुख्यत: कुंडलीतील शुक्र यासंबंधातील हे रत्न आहे.
अंगठी, पेंडंट अथवा ब्रेसलेट स्वरूपात वापरले जाते. ऑस्ट्रेलिया, इथिओपिया, मेक्सिको, ब्राझिल, सुदान, हंगेरी.. अमेरिका येथे मुख्यतः या रत्नांची उत्पत्ती होते. ऑस्ट्रेलियन ऑपेल हे पांढरे शुभ्र व त्यातून सप्तरंगी छटा दृष्टीस पडतात. इथिओपिया व मेक्सिकोचे ओपेल रत्नामध्ये मुख्यत: नारंगी छटा जाणवते. या रत्नांमध्ये दिसणाऱ्या सप्तरंगी छटांमुळे हे रत्न लक्झरिअस दिसते.
साधारणतः अकरा कॅरेटच्या पुढील ऑपेल फुल फायर रत्न खूपच सुंदर दिसते. अनेकदा हिऱ्याचा विकल्प म्हणून देखील रत्न सुचवले जाते. कुंडलीतील कुंभ, कन्या, वृषभ, तूळ लग्न असल्यास ओपेल रत्न सूचवले जाते. कुंडलीतील शुक्र नकारात्मक भावात असल्यास ऑपेल धारण करण्याचा सल्ला दिला जातो.
पामिस्ट्रीनुसार शुक्राच्या उंचवट्यावर विविध प्रकारच्या नकारात्मक चिन्हा मुळे देखील ओपेल रत्न सुचवले जाते. वास्तूमधील दक्षिण, पश्चिम, नैऋत्य भागातील समस्यांवर हे रत्न सुचवले जात. BLACK OPEL रत्न देखील दुर्मिळ तसेच विशेष लोकप्रिय आहे. परंतु त्याचे उत्पादन अतिशय कमी असते. लक्झरिअस ओपेल रत्न हे बऱ्यापैकी महाग असते. त्यामुळे सर्टिफिकेट शिवाय हे रत्न खरेदी करू नये. कोणतेही रत्न तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय वापरू नये.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!