नोएडा – देशभरात कार चोरीच्या अनेक घटना घडतात. त्यामुळे आपली काळ सुरक्षित राहावी, यासाठी अनेक अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित झाले आहे, त्याचा उपयोग वाहन मालक करतात. तरीही चोरटे वेगवेगळ्या युक्त्या शोधून कारची चोरी करतातच. असाच एक प्रकार नवी दिल्ली नजिक नोएडा येथे घडला आहे. कारमधील सॉफ्टवेअरच्या मदतीने त्यांनी कार अनलॉक करून पळून नेली. आपल्या आय-20 कारमध्ये बसून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या कारमध्ये बसून लॅपटॉपमधील काही सॉफ्टवेअरच्या मदतीने प्रथम फॉर्च्युनरकारचे लॉक उघडले आणि नंतर त्यात बसले आणि आरामात निघून गेले.
एखाद्या विज्ञान कल्पनारम्य चित्रपटाच्या कथेसारखी ही घटना वाटू शकते. प्रत्यक्षात हा गुन्हा करण्यासाठी चोरट्यांना अवघी 12 ते 15 मिनिटे लागली. त्यानंतर कार मालकाने पोलीसात या घटनेची तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेक्टर-२२ मध्ये राहणारे अनिल चौहान हे हॉटेल व्यावसायिक आहेत. त्याची फॉर्च्युनर कार घराबाहेर मुख्य रस्त्यालगत उभी होती. पहाटे ३ वाजताच्या सुमारास त्यांच्या फॉर्च्युनरजवळ पांढऱ्या रंगाची I-20 कार थांबली. कारमधील चोरट्यांनी सुमारे 15 मिनिटे आपल्या कार मध्ये घालवली, त्यानंतर लॅपटॉपच्या साह्याने कारचे लॉक उघडल्यानंतर त्याने काच फोडून कारचा दरवाजा उघडून कार चोरून नेली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाली आहे.