मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ऑडी या जर्मन लक्झरी कार उत्पादक कंपनीने २०२३ च्या पहिल्या तिमाहीत प्रबळ विक्री गती कायम ठेवत जानेवारी ते मार्च २०२३ कालावधीमध्ये १,९५० युनिट्सची विक्री केली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ८६२ युनिट्सची विक्री करण्यात आली होती. यंदा विक्रीमध्ये १२६ टक्क्यांच्या वाढीची नोंद करण्यात आली असून यामधून गेल्या सहा वर्षांमधील प्रबळ तिमाही विक्री दिसून येते.
ऑडी इंडियाचे प्रमुख श्री. बलबीर सिंग धिल्लों म्हणाले, ‘‘आम्ही २०२३ च्या पहिल्या तिमाहीत गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत १२६ टक्क्यांची प्रबळ वाढ केली आहे. आमच्या उत्पादन लाइन-अपमध्ये सोळा मॉडेल्सचा समावेश आहे आणि आमचा सध्या आतापर्यंतचा सर्वात प्रबळ एसयूव्ही पोर्टफोलिओ आहे, जो आमच्या एकूण विक्रीमध्ये (२०२३ च्या पहिल्या तिमाहीमधील) ६० टक्क्यांहून अधिक योगदान देतो. नवीन लाँच करण्यात आलेल्या ऑडी क्यू३ व ऑडी क्यू३ स्पोर्टबॅकला देशभरातून प्रबळ मागणी मिळत आहे. आम्ही विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहोत, तसेच आम्हाला संपूर्ण वर्ष २०२३ मध्ये उत्तम कामगिरी करण्याचा विश्वास आहे.’’
ऑडी इंडिया भारतात त्यांचा पूर्वमालकीचा कार व्यवसाय ऑडी अप्रूव्ह्ड: प्लसचे विस्तारीकरण सुरू ठेवत आहे. सध्या देशातील सर्व प्रमुख ठिकाणी बावीस ऑडी अप्रूव्ह्ड: प्लस शोरूम्ससह कार्यरत असलेला ब्रॅण्ड झपाट्याने विस्तार करत आहे आणि २०२३च्या अखेरपर्यंत पंचवीसहून अधिक पूर्वमालकीच्या कार सुविधा असतील.
ऑडी इंडिया सेगमेंट-फर्स्ट उपक्रम देते, ज्यामध्ये अनलिमिटेड मायलेजसह पाच वर्षांसाठी वॉरंटी कव्हरेजचा समावेश आहे. तसेच ब्रॅण्डने ऑडी क्लब रिवार्ड प्रोग्राम लॉन्च केला, जो सर्व विद्यमान ग्राहकांना (ऑडी अप्रूव्ह्ड: प्लस मालकांसह) आणि ऑडी इंडियाच्या भावी ग्राहकांना विशेष उपलब्धता, सेगमेंट-फर्स्ट प्रीव्हीलेजेस आणि बीस्पोक अनुभव देतो.
ऑडी इंडियाच्या उत्पादनांची विद्यमान लाइन-अप आहे: ऑडी ए४, ऑडी ए६, ऑडी ए८ एल, ऑडी क्यू३ स्पोर्टबॅक, ऑडी क्यू५, ऑडी क्यू७, ऑडी क्यू८, ऑडी एस५ स्पोर्टबॅक, ऑडी आरएस५ स्पोर्टबॅक, ऑडी आरएस क्यू८, ऑडी ई-ट्रॉन ५०, ऑडी ई-ट्रॉन ५५, ऑडी ई-ट्रॉन स्पोर्टबॅक ५५, ऑडी ई-ट्रॉन जीटी आणि ऑडी आरएस ई-ट्रॉन जीटी.
२०२३ च्या पहिल्या तिमाहीमधील विक्रीची वैशिष्ट्ये:
एसयूव्हींनी विक्रीमध्ये ६० टक्क्यांहून अधिक योगदान दिले.
ऑडी अप्रूव्ह्ड: प्लस साठी ५० टक्के वाढीसह तिमाहीमधील आतापर्यंतची सर्वात प्रबळ विक्री.
ऑडीच्या फुली इलेक्ट्रिक कार पोर्टफोलिओसह स्पोर्ट कार ऑडी आरएस ई-ट्रॉन जीटी व ऑडी ई-ट्रॉन जीटी यांना ग्राहकांकडून प्रबळ मागणी मिळत आहे.
ऑडी क्यू७, ऑडी क्यू८ व ऑडी ए८ एल या उच्चस्तरीय मॉडेल्सची प्रबळ कामगिरी.
Luxurious Audi Car Sale Jump in 3 Months