मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ऑडी या जर्मन लक्झरी कार उत्पादक कंपनीने आज घोषणा केली की, नवीन उत्पादन लॉन्च आणि ऑडी ई-ट्रॉन श्रेणी, ऑडी क्यू५, ऑडी क्यू७, ऑडी ए४, ऑडी ए६ व एस/आरएस मॉडेल्ससाठी सातत्यपूर्ण मागणीमुळे जानेवारी-जून २०२२ कालावधीमध्ये १७६५ युनिट्सची विक्री केली आहे. ऑडी इंडियाने मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत प्रबळ ४९ टक्क्यांच्या वाढीची नोंद केली आहे.
ऑडी इंडियाचे प्रमुख श्री. बलबीर सिंग धिल्लों म्हणाले, “वर्ष २०२२ च्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये विक्रीत ४९ टक्क्यांची उत्तम वाढ दिसण्यात आली आहे. आम्ही आमच्या इलेक्ट्रिक वेईकल्स ऑडी ई-ट्रॉन ५० व ५५, ऑडी ई-ट्रॉन स्पोर्टबॅक व ऑडी ई-ट्रॉन जीटी श्रेणी यांच्यासह चार्जमध्ये अग्रस्थानी कायम आहोत. आमचा पेट्रोल-संचालित पोर्टफोलिओसह ऑडी ए५, ऑडी क्यू७, ऑडी ए४ व ऑडी ए६ चांगली कामगिरी करत आहे आणि आमचे एस/आरएस मॉडेल्स २०२२ साठी प्रबळ ऑर्डर बुकिंगसह सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. आम्ही आता १२ जुलै २०२२ रोजी भारतात आमची फ्लॅगशिप सेदान ऑडी ए८ एल लॉन्च करण्यास सज्ज आहोत.”
ऑडी इंडियाने नुकतेच देशातील पंधरा गौरवशाली वर्षे साजरी करण्यासाठी सेगमेंट-फर्स्ट उपक्रमाची घोषणा केली. ब्रॅण्डने यंदा विक्री करण्यात आलेल्या त्यांच्या सर्व कार्ससाठी १ जून २०२२ पासून अनलिमिटेड मायलेजसह पाच वर्षांसाठी वॉरंटी कव्हरेज सादर केले. तसेच ब्रॅण्डने ऑडी क्लब रिवॉर्ड्स उपक्रम लॉन्च केला. हा उपक्रम ऑडी इंडियाच्या सर्व विद्यमान कारमालकांना (ऑडी अप्रूव्ह्ड: प्लस कारमालकांसह), तसेच भावी ग्राहकांना विशेष उपलब्धता, सेगमेंट-फर्स्ट प्रीव्हिलेजेस आणि बीस्पोक अनुभव देतो.
ऑडी इंडियाने भारतात त्यांचा पूर्व-मालकीचा कार व्यवसाय ऑडी अप्रूव्ह्ड: प्लसचे विस्तारीकरण सुरू ठेवले आहे. सध्या देशातील सर्व प्रमुख केंद्रांमध्ये सोळा ऑडी अप्रूव्ह्ड: प्लससह कार्यान्वित ऑडी इंडिया झपाट्याने विस्तार करत आहे आणि वर्ष २०२२ अखेरपर्यंत कंपनीची वीस पूर्व-मालकीची कार केंद्रे असतील.
Luxurious Audi car sale 49 percent rise in India