गुरूवार, ऑक्टोबर 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

गोपालकांनो सावधान! या कारणामुळे होतोय लम्पी आजाराचा प्रादुर्भाव

नोव्हेंबर 15, 2022 | 5:24 am
in राज्य
0
lumpi skin diseas

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लम्पी रोगाच्या लक्षणांची तीव्रता लक्षात घेता रोगावर नियंत्रण मिळवण्याकरीता प्रभावीपणे उपाययोजनांबाबत महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठाच्या तज्ज्ञ पथकाने संशोधन करावे, तसेच राज्यामध्ये लम्पी चर्मरोगाच्या सद्यस्थितीवर केंद्रीय संशोधन संस्थांकडून मार्गदर्शन घेण्यात यावे असे निर्देश महसूल ,पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले.

सर्वसाधारणपणे गोधनास कळपामध्ये चरण्यासाठी पाठविणे आणि सार्वजनिक पाणवठ्यावर त्यांना पाणी पाजण्यासाठी कळपाने नेण्याच्या गावांमधील दोन्ही पद्धती देखील लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भावास कारणीभूत असल्याचे मत राज्यस्तरीय कार्यदलाने व्यक्त केले असल्यामुळे आयुक्त पशुसंवर्धन, यांनी या दोन्ही पद्धती लम्पी चर्मरोग नियंत्रणात येईपर्यंत बंद ठेवण्याबाबत गोपालकांमध्ये जागृती करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

मंत्री राधाकृष्ण विखे पाटिल यांनी पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव आयुक्त पशुसंवर्धन सचिंद्र प्रताप सिंह अतिरिक्त आयुक्त पशुसंवर्धन व संचालक (विस्तार शिक्षण) महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठ तथा राज्यस्तरीय कार्यदलाचे सभासद व लम्पी चर्मरोग तज्ज्ञ यांच्या समवेत बुलढाणा, जळगांव, अमरावती, अकोला, अहमदनगर, सातारा, सोलापूर, औरंगाबाद, कोल्हापूर आणि सांगली या लम्पी चर्मरोगाचा जास्त प्रादुर्भाव असणाऱ्या 10 जिल्ह्यांमधिल जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद तसेच पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे घेतलेल्या बैठकीमध्ये रोगपरिस्थितीचा आढावा घेतला.

जास्त प्रार्दुभाव असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी जिल्ह्यातील संबंधित अधिकारी यांची बैठक घेऊन गोठ्यातील कीटक नियंत्रण, निर्जंतुकीकरणाला प्राधान्य द्यावे. गावातील सरपंच, ग्रामसेवक आणि तलाठी यांना जबाबदारी सोपवावी. रोगाचा प्रादुर्भाव वाढणार नाही यासाठी करण्यात येणाऱ्या प्रत्येक बाबींवर गांभीर्याने लक्ष ठेवावे, असे विखे पाटील यांवी सांगितले. पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी रोग प्रादुर्भाव नियंत्रणासाठी “माझा गोठा, स्वच्छ गोठा” अभियान राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत.

राज्यातील सद्यस्थिती अशी
राज्यातील 34 जिल्ह्यांमधील एकूण 3 हजार 551 संसर्गकेंद्रांमध्ये लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील एकूण 246065 बाधित पशुधनापैकी एकूण 173841 पशुधन उपचाराने बरे झालेले आहे. उर्वरीत बाधित पशुधनावर उपचार सुरु आहेत. बाधित पशुधनापैकी 16 हजार 405 पशुधनाचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत लम्पी चर्मरोगामुळे मृत्युमुखी पडलेल्या गोवंशीय पशुधनाच्या 5 हजार 435 पशुपालकांच्या खात्यांवर नुकसान भरपाई प्रित्यर्थ रु. 14 कोटी रक्कम जमा करण्यात आली आहे.

आजवरचे लसीकरण
राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आज अखेर एकूण 144.12 लक्ष लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामधून एकूण 137.76 लक्ष पशुधनास मोफत लसीकरण करण्यात आले आहे व जळगांव, अहमदनगर, धुळे, अकोला, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, वाशिम, जालना, हिंगोली, नंदुरबार आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांमधील लसीकरण पूर्ण झाले आहे. खासगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांनी करून घेतलेले लसीकरण यांची आकडेवारी नुसार महाराष्ट्रात सुमारे 98.43 % गोवंशीय पशुधनाला लसीकरण झाले आहे.

Lumpi Skin Disease Alert Cow Animals Infection

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

दीड तासांच्या युक्तीवादानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने घेतला हा निर्णय; ठाकरेंना दिलासा की दणका?

Next Post

देशात पेट्रोल, डिझेल होणार स्वस्त; हा निर्णय घेण्याची मोदी सरकारची तयारी

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

महत्त्वाच्या बातम्या

केंद्राचे गिफ्ट! महाराष्ट्रात होणार हे दोन रेल्वेमार्ग

ऑक्टोबर 8, 2025
FB IMG 1755619676395 1024x634 1
महत्त्वाच्या बातम्या

असे आहे पॅकेज… शेतकऱ्यांना मिळणार एवढे पैसे, या सवलती… जाणून घ्या सविस्तर…

ऑक्टोबर 8, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
महत्त्वाच्या बातम्या

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्वाचे निर्णय

ऑक्टोबर 8, 2025
Untitled 31
मुख्य बातमी

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी इतक्या हजार कोटींचे पॅकेज

ऑक्टोबर 8, 2025
AirAsia e1678528968685
महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीच्या सणात विमान तिकीट दर वाढणार?

ऑक्टोबर 6, 2025
aadhar
महत्त्वाच्या बातम्या

लहान मुलांच्या आधार नोंदणीबाबत नवी घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
DRI1JPGDBUG
महत्त्वाच्या बातम्या

“ऑपरेशन डिजीस्क्रॅप” अंतर्गत झाली ही मोठी कारवाई

ऑक्टोबर 6, 2025
M 1024x768 1
महत्त्वाच्या बातम्या

साखर कारखान्यांबाबत अमित शाह यांनी केली ही घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
Next Post
petrol diesel1

देशात पेट्रोल, डिझेल होणार स्वस्त; हा निर्णय घेण्याची मोदी सरकारची तयारी

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011