गुरूवार, ऑगस्ट 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

भारतातील सर्वात वेगवान स्मार्ट टीव्ही लॉन्च…ही आहे वैशिष्ट्ये

by Gautam Sancheti
एप्रिल 14, 2025 | 8:09 am
in संमिश्र वार्ता
0
room v7 1 1

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- २०२४ मध्ये स्थापन झालेल्या सर्किट हाऊस टेक्नॉलॉजीजने आपला नवीन ब्रँड लुमिओसह भारतातील सर्वात वेगवान स्मार्ट टीव्ही लॉन्च करत स्मार्ट टीव्ही बाजारात खळबळ उडवून दिली आहे. ल्‍युमिओने भारतातील ५ अब्ज डॉलर्सच्या स्मार्ट टीव्ही बाजारपेठेतील स्लो टीव्हीची समस्या दूर करण्यासाठी आज भारतीय बाजारात ल्‍युमिओ व्हिजन ९ आणि ल्‍युमिओ व्हिजन ७ हे दोन प्रीमियम स्‍मार्ट टीव्‍ही लाँच केले आहेत. ल्‍युमिओ व्हिजन ९ हा एक क्यूडी-मिनी एलईडी टीव्ही आहे तर व्हिजन ७ हा क्यूएलईडी पॉवरहाऊस आहे. हे दोन्ही टीव्ही जलद गती, रंगीत आणि अचूक डिस्प्लेसह घरी थिएटरसारखा अनुभव देतात.

सर्किट हाऊस टेक्‍नॉलॉजीजचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी रघु रेड्डी म्‍हणाले, ”आम्‍ही सर्वांसाठी स्‍लो टीव्‍हीची समस्या दूर करण्यासाठी भारतात वेगवान स्मार्ट टीव्‍ही डिझाइन केले आहेत. आम्ही ल्‍युमिओ व्हिजन ९ आणि व्हिजन ७ सिरीजसह आम्‍ही गतीशील स्‍पीड, दर्जात्‍मक पिक्‍चर व साऊंड देत आहोत, ज्‍यामधून भारतातील ग्राहकांना आनंदमय मनोरंजनाचा अनुभव मिळेल.”

ल्‍युमिओने लॉन्च केलेले स्मार्ट टीव्ही व्हिजन ९ आणि व्हिजन ७ हे उत्तम तंत्रज्ञान आणि परवडणाऱ्या किमतीचे उत्तम मिश्रण आहेत. दोन्ही टीव्हीमध्ये फ्लॅगशिप बॉस प्रोसेसर, ३ जीबी डीडीआर४ रॅम आणि डीओपीई डिस्प्ले आहे, ज्यामुळे रंग अतिशय अचूक दिसतात. प्रीमियम क्यूएलईडी तंत्रज्ञान आणि १००% पेक्षा जास्त रंगीत कव्हरेजसह, हे टीव्ही तुम्हाला एक अद्भुत आणि वास्तववादी अनुभव देतील.

ल्‍युमिओ व्हिजन ७ आणि व्हिजन ९ दोन्हीमध्ये डॉल्बी व्हिजन®, डॉल्बी अ‍ॅटमॉस, डीजीएस ऑडिओसह क्वाड स्पीकर सिस्टम आहे, जे १५०% मोठ्या स्पीकर कॅव्हिटीसह इमर्सिव्ह ध्वनी प्रदान करते. दोन्ही सीरीजमध्ये ३ एचडीएमआय पोर्ट (४८जीबीपीएस बँडविड्थ, एक इ-एआरसी), ३ यूएसबी पोर्ट, ऑप्टिकल ऑडिओ आउटपुट आणि हाय-स्पीड वाय-फायसह कनेक्टिव्हिटी उत्तम आहे. तसेच, व्हिजन ७ मध्ये १६ जीबी स्टोरेज आणि व्हिजन ९ मध्ये ३२ जीबी स्टोरेज देण्यात आले आहे.

भारतातील स्‍मार्ट टीव्‍ही बाजारपेठेत गेल्‍या आठ वर्षांमध्‍ये जवळपास ६० दशलक्ष युनिट्सचे शिपिंग दिसण्‍यात आले आहे. तरीदेखील, मोठी समस्‍या कायम आहे, ती म्‍हणजे स्‍लो व लॅगी इंटरफेसेस. ल्‍युमिओने केलेल्‍या संशोधनामधून भारतातील स्‍मार्ट टीव्‍ही वापरकर्त्‍यांसाठी मंद गतीने कार्यसंचालन ही प्रमुख समस्‍या असल्‍याचे निदर्शनास येते. लॅगिंग इंटरफेसेसपासून प्रतिसाद न देणाऱ्या रिमोट बटन क्लिक्‍सपर्यंत लाखो कुटुंबं टेलिव्हिजन्‍सच्‍या समस्‍यांमध्‍ये अडकलेले आहेत, जे आधुनिक मागण्‍यांची पूर्तता करण्‍यास असमर्थ ठरतात. ल्‍युमिओ यामध्‍ये बदल करण्‍यासाठी आले आहे.

ल्‍युमिओ व्हिजन ९ची वैशिष्ट्ये:
· अद्वितीय कॉन्ट्रास्‍ट व वैविध्‍यतेसाठी १९२० ब्‍ल्‍यू मिनी-एलईडीसह क्‍वॉन्‍टम डॉट एन्‍हासमेंट लेयर
· कोणत्याही प्रकाशात आश्चर्यकारक स्पष्टतेसाठी ९०० निट्स पर्यंतची कमाल ब्राइटनेस
· कलर गम्‍यूट कव्‍हरेज: डीसीआय-पी३ १११ टक्‍के, आरईसी २०२० ८१ टक्‍के
· जवळपास परिपूर्ण कलर अॅक्‍यूरसीसाठी कलर डेल्‍टा ई १.७१
· प्रीमियम क्‍वॉलिटी स्‍मार्ट टीव्‍हींसाठी वाढत्‍या मागणीची पूर्तता करण्‍यासाठी ५५ इंच स्क्रिन आकारामध्‍ये उपलब्‍ध

ल्‍युमिओ व्हिजन ७ ची वैशिष्ट्ये:
· कोणत्‍याही प्रकारच्‍या प्रकाशासाठी जवळपास ४०० नीट्स ब्राइटनेस.
· कलर गम्‍यूट कव्‍हरेज: डीसीआय-पी३ ११४ टक्‍के, आरईसी २०२० ८३ टक्‍के.
· अपवादात्‍मक कलर अचूकतेसाठी १.०८ इतके कमी कलर डेल्‍टा ई, आकार ४३ इंच, पिक्‍चर क्‍वॉलिटीबाबत कोणतीच तडजोड नाही.
· कॉम्‍पॅक्‍ट अपार्टमेंट्सपासून एैसपैस लिव्हिंग रूम्‍सपर्यंत प्रत्‍येक कुटुंबासाठी डिझाइन करण्‍यात आलेला प्रीमियम अनुभव, आकार ४३ इंच, ५० इंच व ५५ इंच.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

बोगस शिक्षक घोटाळाप्रकरणी तिघांना अटक, पोलिसांची मोठी कारवाई

Next Post

पंजाब नॅशनल बँक कर्ज घोटाळा प्रकरणातील फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
mehul choksi e1744599406539

पंजाब नॅशनल बँक कर्ज घोटाळा प्रकरणातील फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक

ताज्या बातम्या

kapus

कापूस आयात शुल्क माफीचा निर्णय: शेतकरी नाराज

ऑगस्ट 21, 2025
Screenshot 20250821 161509 Facebook 1

नाशिक महानगरपालिकेची अतिक्रमणाविरोधात धडक कारवाई….या भागात रस्त्यालगत उभारलेली ३० अनधिकृत गाळे व पत्राशेड हटवले

ऑगस्ट 21, 2025
प्रातिनिधिक फोटो

दिवाळी आणि छठ पूजेसाठी १२ हजाराहून अधिक विशेष रेल्वे गाड्या…परतीच्या तिकिटांवर इतके टक्के सूट

ऑगस्ट 21, 2025
Untitled 26

सात दिवसात हवामानाचे २३९ अलर्ट २५३.७४ कोटी नागरिकांपर्यंत प्रसारित….राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती

ऑगस्ट 21, 2025
crime 88

घरफोडीत चोरट्यांनी पावणे दोन लाखाच्या ऐवजावर मारला डल्ला…आडगाव शिवारातील घटना

ऑगस्ट 21, 2025
cbi

CBI ने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या प्रकल्प संचालकाला ६० हजाराची लाच घेतांना केली अटक…

ऑगस्ट 21, 2025
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011