नवी दिल्ली – कोरोनाचा कहर सुरू असताना इंधन दरवाढीचाही भडका उडालेला आहे. गेल्या सहा महिन्यापासून दरवाढीचा आलेख चढाच राहिला आहे. परिणामी महागाईही चांगलीच वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसली आहे. पेट्रोल-डिझेल शंभरीपार गेल्यानंतर स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. आता इंधनासह एलपीजी गॅस वापरावा की नाही असाच प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात निर्माण होत आहे.
तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचे दर पुन्हा भडकले आहेत. या महिन्यात गॅस सिलिंडर २५ रुपये ५० पैशांनी महागला आहे. मुंबई आणि दिल्लीतील १४.२ किलो वजनाच्या सिलिंडरचे दर आता ८३४.५० रुपयांनी वाढले आहेत. एप्रिलमध्ये हेच दर ८०९ रुपये होते. या वर्षी जानेवारी ते आतापर्यंत १४.२ किलो वजनाचा सिलिंडर १४०.५० रुपयांनी महागला आहे. एक जानेवारीला दिल्लीत सिलिंडरचा दर ६९४ रुपये इतका होता.
या वर्षी एलपीजीचे दर फेब्रुवारीत तीन वेळा वाढले आहेत. प्रथम ४ फेब्रुवारीला २५ रुपये, १४ फेब्रुवारीला ५० रुपये त्यानंतर २५ फेब्रुवारीला तिसर्यांदा २५ रुपयांनी दरवाढ झाली होती. एक मार्चला गॅस सिलिंडर २५ रुपयांनी महागला. यादरम्यान पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमुळे १ एप्रिलला गॅसच्या किमतीत प्रति सिलिंडर १० रुपयांनी घट झाली होती. आता जुलैमध्ये २५ रुपयांनी गॅस भडकला आहे.
महिना
|
दिल्ली
|
कोलकाता
|
मुंबई
|
चेन्नई
|
जुलै १,२०२१
|
८३४.५
|
८६१
|
८३४.५
|
८५०
|
जून १, २०२१
|
८०९
|
८३५.५
|
८०९
|
८२५
|
मे १, २०२१
|
८०९
|
८३५.५
|
८०९
|
८२५
|
एप्रिल १, २०२१
|
८०९
|
८३५.५
|
८०९
|
८२५
|
मार्च १ , २०२१
|
८१९
|
८४५.५
|
८१९
|
८३५
|
फेब्रुवारी २५ , २०२१
|
७९४
|
८२०.५
|
७९४
|
८१०
|
फेब्रुवारी १५ , २०२१
|
७६९
|
७९५.५
|
७६९
|
७८५
|
फेब्रुवारी ४, २०२१
|
७१९
|
७४५.५
|
७१९
|
७३५
|
जानेवारी १ , २०२१
|
६९४
|
७२०.५
|
६९४
|
७१०
|
स्रोत: IOC