मुंबई – आजच्या काळात प्रत्येक घरात स्वयंपाकासाठी गॅस सिलिंडरही अत्यावश्यक गोष्ट बनली आहे. मात्र एक काळ होता की खेडे गावातील बहुतेक स्त्रिया चुलीवर लाकूड पेटवून अन्न शिजवायच्या, पण आता खेडयापाडयातही जवळजवळ प्रत्येकाच्या घरात गॅस सिलेंडर आले आहेत. आता महिला त्यावर आरामात स्वयंपाक करतात. परंतु ते तितकेच धोकादायक आहे. कारण याची योग्य दखल आणि काळजी घेतली नाही तर मोठी दुर्घटना घडू शकते. मात्र, दुर्घटना धडल्यास तुम्हाला आर्थिक मदत मिळू शकते.
एलपीजी सिलिंडरमध्ये स्फोट झाल्याची अनेक प्रकरणे आपण पाहिली किंवा ऐकली आहेत, मात्र गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यास कंपनीकडून ५० लाख रुपये मिळू शकतात. कोणताही भयानक अपघात होणार नाही. याकरिता एलपीजी सिलेंडर वापरताना अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, मात्र गॅस सिलिंडरमुळे अपघात झाल्यास गॅस कंपन्या विमा सुविधा देखील देतात, त्याबद्दल जाणून घेऊ या…
एलपीजी कंपनीचा ग्राहक म्हणून, कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या सुविधा आणि हक्कांबद्दल जागरूक राहणे खूप महत्वाचे आहे. जेव्हा ग्राहक गॅस कनेक्शन घेतात, तेव्हा गॅस कंपनी वैयक्तिक अपघाताचे कवच देखील देते, ज्याबद्दल बहुतेक ग्राहकांना माहिती नसते. ग्राहकांना मिळणाऱ्या वैयक्तिक अपघाताच्या कव्हर अंतर्गत, आग लागल्यास आणि मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यास सिलिंडर फुटणे किंवा गॅस गळतीपासून मुक्त होण्यासाठी १० ते ५० लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत दिली जाते.
तसेच अपघातात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास गॅस कंपन्यांकडून जास्तीत जास्त ५ लाख रुपये भरपाई दिली जाते. याशिवाय अपघातामध्ये तात्काळ मदतीसाठी प्रति व्यक्ती २५ हजार रुपयेही दिले जातात. अपघातात मालमत्तेचे नुकसान झाल्यास १ लाख रुपयांची भरपाई देखील उपलब्ध आहे. परंतु विम्याचा दावा करण्यासाठी, आपल्याला अपघातानंतर ताबडतोब आपल्या गॅस डीलरला कळवावे लागेल आणि पोलिसांकडे तक्रार देखील करावी लागेल.