मुंबई – देशभरातील प्रत्येक नागरिकाच्या घरांमध्ये रोजच्या स्वयंपाकासाठी गॅस सिलिंडर उपलब्ध व्हावा, या उद्देशाने केंद्र सरकारने विविध योजना आणल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे एलपीजी गॅस सिलिंडर सबसिडी किंवा अनुदान होय. सर्वसामान्य आर्थिक दृष्ट्या कमकुवत घटकांना या सबसिडीचा लाभ मिळतो. गेल्या काही दिवसांपासून ही सबसिडी बंद करण्यात आली होती, परंतु आता पुन्हा एकदा ही सबसिडी मिळण्यास सुरुवात झाली आहे. त्याचा नागरिकांना लाभ घेता येऊ शकतो.
एलपीजीवरील सबसिडी आता पुन्हा सुरू झाली असून घरगुती गॅसची सबसिडी गेल्या अनेक महिन्यांपासून ग्राहकांच्या खात्यात येत नव्हती. मात्र आता 79.26 रुपये प्रति सिलिंडर अनुदानाच्या स्वरूपात येऊ लागले आहेत. काही वर्षांपूर्वी 200 रुपयांपर्यंत सबसिडी मिळत होती, ती आता 79.26 रुपयांवर आली आहे. तथापि, काही ग्राहकांना 158.52 रुपये किंवा 237.78 एलपीजी सबसिडी मिळत आहे. आपण याचे लाभार्थी असाल आणि आपल्या खात्यात ती रक्कम येत नसेल तर जवळच्या वितरकाशी संपर्क साधा आणि त्याला ही समस्या सांगा.
याशिवाय, तुम्ही १८००२३३३५५५ या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून तक्रार नोंदवू शकता. एलपीजीची सबसिडीची रक्कम प्रत्येक राज्यांमध्ये वेगळी आहे, ज्या लोकांचे वार्षिक उत्पन्न 10 लाख किंवा त्याहून अधिक आहे, त्यांना सबसिडी दिली जात नाही. 10 लाख रुपयांचे हे वार्षिक उत्पन्न पती-पत्नी दोघांच्या मिळकत मानले जात आहे.
सबसिडीची रक्कम अशी तपासा…
– प्रथम http://mylpg.in/ वर जा आणि तुमचा LPG आयडी टाका.
– तुम्ही ज्या कंपनीचा LPG वापरत आहात त्या कंपनीच्या आधारावर तुम्हाला आवश्यक माहिती द्यावी लागेल.
– तुमचा 17 अंकी LPG आयडी एंटर करा आणि मोबाईल नंबर नोंदवा.
– आता योग्य कोड टाका आणि proceed वर क्लिक करा.
– तुमच्या दिलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल.
– आता तुम्हाला तुमचा ईमेल आयडी टाकावा लागेल.
– एकदा तुम्हाला पासवर्ड तयार करावा लागेल, त्यानंतर तुमच्या ईमेल आयडीवर एक लिंक मिळेल
– तुमच्या मेलवर गेल्यानंतर तुम्हाला त्या लिंकवर क्लिक करावे लागेल.
– आता mylpg.in खात्यावर लॉग इन करा आणि पॉप अप संदेशामध्ये तुमचा तपशील प्रविष्ट करा.
– आता पहा सिलेंडर बुकिंग हिस्ट्री किंवा सबसिडी ट्रान्सफर या पर्यायावर क्लिक करा.