मुंबई – एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढल्याने सर्वसामान्य जनतेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पण या सणासुदीच्या काळात डिजिटल पेमेंट कंपनी पेटीएमने गॅस सिलिंडर वापरणाऱ्यांसाठी एक सुवर्ण संधी दिली आहे एलपीजी सिलिंडर बुक केल्यास ग्राहकांना सोने जिंकण्याची संधी मिळणार आहे आहे.
पेटीएम गॅस सिलिंडर बुकिंगवर खास ‘नवरात्री गोल्ड ऑफर’ दिली आहे. या ऑफर अंतर्गत ग्राहक दररोज 10,001 रुपयांपर्यंत किमतीचे सोने जिंकू शकतात. ग्राहक कोणत्याही कंपनीच्या सिलिंडर बुकिंगवर या ऑफरचा लाभ घेऊ शकतात. ही ऑफर दि. 7 ते 16 ऑक्टोबर पर्यंत वैध आहे. तसेच नवरात्री गोल्ड ऑफरचा एक भाग म्हणून आपण पेटीएम डिजिटल गोल्डसह प्रत्येक बुकिंगवर कॅशबॅक पॉइंट देखील जिंकू शकता.
पेटीएम अॅपवरून एलपीजी सिलिंडरची बुकिंग करणाऱ्या पाच भाग्यवान वापरकर्त्यांना दररोज 10,001 रुपयांचे पेटीएम डिजिटल गोल्ड जिंकण्याची संधी मिळेल. तसेच पेटीएम अॅपवरील ‘बुक गॅस सिलिंडर’ पर्यायाद्वारे विद्यमान सिलेंडर बुकिंगच्या पेमेंटवरही ही ऑफर लागू होईल. या व्यतिरिक्त प्रत्येक बुकिंगवर 1,000 कॅशबॅकचे निश्चित बक्षीस देखील मिळेल. पेटीएमची ही ऑफर सर्व 3 प्रमुख एलपीजी कंपन्यां म्हणजे इंडेन, हिन्दुस्थान पेट्रोलिअम (एचपी) गॅस आणि भारत गॅसच्या सिलिंडर बुकिंगवर लागू आहे.
पेटीएम अॅपचा वापर करून एलपीजी सिलिंडर बुक करण्यासाठी, ग्राहकाला आधी ‘बुक गॅस सिलिंडर’ पर्यायावर जावे लागेल. यानंतर गॅस कंपनी निवडावी लागेल. यानंतर मोबाईल नंबर, एलपीजी आयडी आणि ग्राहक क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर पेटीएम वॉलेटचा वापर करून पेमेंट करू शकता. आपणास हवे असल्यास Paytm UPI कार्ड, नेटबँकिंग किंवा Paytm पोस्टपेड ऑप्शन या पेमेंटसाठी वापरू शकता. एकदा बुकिंग पूर्ण झाल्यावर सिलिंडर आपल्या घरी पोहोचवला जाईल.