नवी दिल्ली – घरगुती गॅस सिलिंडर खरेदी केल्यानंतर, त्यावर अनुदान मिळते की नाही याची अनेकदा ग्राहकांना चिंता असते. कारण काही वेळा विशिष्ट रकमेपेक्षा कमी व्यवहार एसएमएसद्वारे प्राप्त होत नाहीत. यामुळे काही लोक अस्वस्थ होतात. तथापि, आपण एलपीजी कंपनीच्या वेबसाइटद्वारे आपल्याला नियमितपणे अनुदानाची रक्कम मिळत आहे की नाही हे सहज शोधता येऊ शकते.
आपल्याला अनुदानाची रक्कम मिळत असेल तर कोणत्या रकमेवर, किती बुकिंगवर, किती रुपयांचे अनुदान मिळाले, यासंबंधित माहितीदेखील आपणास कळेल.
या गोष्टी तपासण्याचा मार्ग कोणता आहे ते जाणून घेऊ या…
१. कोणत्याही ब्राउझरमध्ये आपली एलपीजी सेवा प्रदाता कंपनी वेबसाइट उघडा.
२. आपण आधीपासूनच वेबसाइटवर खाते तयार केले असेल तर लॉगिन आयडी आणि संकेतशब्दाने लॉग इन करा.
३. त्याचवेळी जर आपण एखादे खाते तयार केले नसेल तर एलपीजी आयडी, ग्राहक क्रमांक आणि इतर माहितीच्या सहाय्याने खाते तयार करा आणि त्यानंतर लॉग इन करा.
४. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला ‘व्ह्यू सिलेंडर बुकिंग हिस्ट्री’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
५. येथे तुम्हाला अनुदानाशी संबंधित संपूर्ण माहिती मिळेल.
६. आपल्याला अनुदान मिळत नसेल तर आपल्याला आपल्या एलपीजी डीलरशी संपर्क साधावा लागेल.
अनेक कारणे
अनुदान उपलब्ध नसण्याची अनेक कारणे असू शकतात. त्यातील सर्वात मोठे कारण म्हणजे केवायसीशी संबंधित कागदपत्रे अद्ययावत न करणे. यामध्ये, जर तुमचा आधार एलपीजी आयडीशी जोडलेला नसेल तर तुमचे अनुदान उपलब्ध होणार नाही.
त्याचप्रमाणे, जर तुमचा आधार दिलेल्या बँक खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही. या व्यतिरिक्त, जर कुटुंबातील पती-पत्नीचे एकूण वार्षिक उत्पन्न 10 लाखाहून अधिक असेल तर तुम्हाला एलपीजी सिलिंडरवरील अनुदानाचा लाभ मिळणार नाही. एखाद्याचे वार्षिक उत्पन्न सहा लाख रुपये असेल तर त्याला अनुदान मिळेल.